सलमान अजूनही खरा अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 17:03 IST
त्याचे दर्शकांशी घट्ट नाते आहे. त्यामुळेच त्याचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर ब्लॉकबस्टर होतात. सलमान खानने अत्यंत चांगल्या भूमिका आणि दिग्दर्शक ...
सलमान अजूनही खरा अभिनेता
त्याचे दर्शकांशी घट्ट नाते आहे. त्यामुळेच त्याचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर ब्लॉकबस्टर होतात. सलमान खानने अत्यंत चांगल्या भूमिका आणि दिग्दर्शक निवडले. तो अजूनही खरा अभिनेता आहे, असे मत सुलतानचे दिग्दर्शक अली अब्बार जफर यांनी व्यक्त केले.सलमानच्या अभिनयाची झलक खामोशी आणि हम दिल दे चुके सनम चित्रपटातून पहावयास मिळाली. दबंग आणि बजरंगी भाईजानमधून त्याने आपली उपस्थिती लोकांना दाखवून दिली.सुलतानचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या अनुसार कुस्तीगीर म्हणून सलमान खानची भूमिका दिग्दर्शित करताना ते त्याच्याशी भावनिकरित्या जोडले गेले. सलमान असे व्यक्तीमत्व आहे, ज्याच्याभोवती लोक सतत जमा असतात. पडद्यावर कोणतीही भूमिका करताना त्याला फारशा परिश्रमाची गरज लागत नाही. असे जफर यांना वाटते.‘ही त्याची सशक्त बाजू आहे. तो जितके कमी करतो, तितके लोकांना आवडते. तो आपल्या मनाचा वापर करीत नाही. तो भावनांचा अधिक वापर करतो. तुम्ही त्याला भावनिकदृष्ट्या चार्ज करु शकता. तो अत्यंत सरळमार्गी माणूस असल्याचे जफर म्हणतात.सलमान आणि जफर पहिल्यांदाच एकत्र आलेले नाहीत. २००७ साली कबीर खानसमवेत सलमानच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटादरम्यान जफर हे सहायक दिग्दर्शक होते.