Join us

​सलमानने शेअर केल्या जुण्या आठवणी; शाहरुख, हृतिकला दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 21:23 IST

बॉलिवूडचा दंबग स्टार सलमान खान ट्विटरवर चांगलाच अ‍ॅक्टिव्ह आहे. ट्विटरहून तो अनेक गोष्टी शेअर करीत असतो. रविवारी सलमान खानने ...

बॉलिवूडचा दंबग स्टार सलमान खान ट्विटरवर चांगलाच अ‍ॅक्टिव्ह आहे. ट्विटरहून तो अनेक गोष्टी शेअर करीत असतो. रविवारी सलमान खानने केलेले एक ट्विट चांगलीच प्रसिद्धी मिळवित आहे. विशेष म्हणजे या ट्विटसोबत त्याने शाहरुख व हृतिक यांच्यासोबत काढलेला एक फोटो शेअर केला आहे. शाहरुख खानचा रईस व हृतिक रोशनचा काबिल या चित्रपटासाठी त्याने दोघांचे अभिनंदनही क रीत जुण्या आठवणींना उजाळा दिला आहे. सलमान खानने ट्विटरवर फोटो शेअर करताना लिहले, शाहरुख आणि मला २१ वर्षांपर्वू करण अर्जुन देण्यासाठी राकेशजीचा आभारी आहे. हृतिक रोशनला १७ वर्षांपूर्वी ‘कहो ना प्यार है’साठी धन्यवाद, २५ जानवारीसाठी शाहरुखला ‘रईस’ व हृतिकला ‘काबिल’साठी शुभेच्छा. राकेश रोशन यांना धन्यवाद देताना सलमान खान याने करण अर्जुनचा उल्लेख केला आहे. राकेश रोशन यांचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला होता. यात शाहरुख व सलमान खान यांनी दोघा भावांची भूमिका केली होती. शाहरुखच्या जीवनात या चित्रपटाचे महत्त्वाचे स्थान असल्याचे त्याने मान्य केले आहे. शाहरुख व सलमान यांनी ‘हम तुम्हारे है सनम’ व कुछ कुछ होता है या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात शाहरुख खानच्या प्रमुख भूमिका होती तर सलमानने यात किमोओ केला होता.  लवकरच शाहरुख खान सलमानच्या चित्रपटात किमोओ करणार असल्याच्या चर्चा आहेत. दुसरीकडे शाहरुखही सलमान संचालित करीत असलेल्या बिग बॉसमध्ये रईसचे प्रमोशन करताना दिसणार असल्याचे समजते. शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘रईस’ हा चित्रपट आधी ‘सुल्तान’च्या सोबत ईदच्या दिवशी रिलीज होणार होता मात्र दोघांनी आपसांत ठरवून या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले होते. हृतिक रोशनचा ‘काबिल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पूर्वी २६ जानेवारी ठरविण्यात आली होती. मात्र शाहरुखच्या चित्रपटासोबत क्लॅश नसावे यासाठी ती तारीख बदलून २५ जानेवारी करण्यात आली. २५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता ‘काबिल’ प्रदर्शित होणार आहे. मात्र शाहरुखने ‘रईस’च्या प्रदर्शनाची तारीख २५ जानेवारी ठरविली. यामुळे राकेश रोशन व शाहरुख खान यांच्यात वाद निर्माण झाला आहे. आता यात मध्यस्ती करण्याचा प्रयत्न सलमान आपल्या परिने करताना दिसतो आहे, असेच म्हणावे लागेल. }}}} ">http://