Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान वलुचावर फिदा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 11:47 IST

शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यातील ‘वैर’ कुणापासूनही लपून राहिलेले नाही. मात्र अलीकडे त्यांच्या प्रेमाचे वारे वाहू लागले आहे. ...

शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यातील ‘वैर’ कुणापासूनही लपून राहिलेले नाही. मात्र अलीकडे त्यांच्या प्रेमाचे वारे वाहू लागले आहे. इतके की, सलमान पार्ट्यांमध्ये शाहरूखच्या पत्नीसोबत दिसू लागला आहे. आता तुम्ही शाहरूखची रिअल लाईफ पत्नी गौरी खानचा विचार करत असाल तर जरा थांबा. आम्ही गौरीची नाही तर शाहरूखची रिल लाईफ पत्नी वलुचा डिसूजा हिच्याबद्दल बोलतोय. वलुचाने ‘फॅन’मध्ये शाहरूखच्या पत्नीची भूमिका साकारली होती. वलुचा अलीकडे सलमानसोबत अनेक पार्ट्यांमध्ये दिसू लागली आहे. सलमान व वलुचा जरा जास्तच जवळ आलेले यादरम्यान पाहायला मिळत आहे. अलीकडे सलमानच्या ‘बीर्इंग ह्युमन’च्या एका इव्हेंटमध्येही सलमान व वलुचा एकत्र दिसले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्ट्यांमध्ये अन्य हिरोईन्स असूनही सलमान वलुचासोबतच अधिक दिसला. सलमानच्या पुढील चित्रपटाचा वलुचाची तर वर्णी लागणार नाही ना? असाच प्रश्न त्यामुळे विचारला जात आहे. तसे संकेतही मिळत आहेत. सलमानच्या कॉस्च्युम डिझायनरने गत काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला होता. यात सल्लू वलुचासोबत दिसला होता. या फोटोच्या कॅप्शनखाली ‘दबंग3’च्या ‘पॉसिबल हिरोईन्स’,असे लिहिलेले होते. आता सलमान व वलुचा यांच्या जवळीकीमागे हेच कारण आहे की आणखी काही, हे मात्र शोधावे लागेल.