Join us

सलमान-लुलिया चंदीगडमध्ये एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 11:43 IST

 जेव्हापासून सलमान खानने ‘सुल्तान’ चित्रपटात काम करायला सुरूवात केली तेव्हापासून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. काल मुंबई विमानतळावर सलमान ...

 जेव्हापासून सलमान खानने ‘सुल्तान’ चित्रपटात काम करायला सुरूवात केली तेव्हापासून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. काल मुंबई विमानतळावर सलमान खान त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतुर हिच्यासोबत दिसला.तिच्यासोबत अजून आई सलमा खान आणि बहीण अलविरा अग्निहोत्री हे देखील होते. सलमान अगोदर एअरपोर्टवरून बाहेर पडला आणि सरळ त्याच्या कारकडे निघाला. त्यानंतर लुलिया सलमानची आई ‘सलमा’ सोबत हातात हात घेऊन येत होती.सलमान-लुलिया यांनी चंदीगढमध्ये बराच वेळ एकत्र घालवला. सध्या दोघेही त्यांच्या लग्नासाठी घरच्यांसोबत गोडीगुलाबीने वागत असल्याचे कळते आहे.