Join us

सलमान करणार ‘ट्रिपल एक्स-रिर्टन आॅफ झेंडर केज’चे ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:12 IST

दीपिका सलमानसोबत स्टेज शेअर करताना दिसणार आहे. कशासाठी? तर तर तिच्या हॉलिवूडपटाच्या ट्रेलर लाँचसाठी. होय, ‘बिग बॉस’मध्ये दीपिका ‘ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ झेंडर केज’ या तिच्या हॉलिवूडपटाचे ट्रेलर लॉन्च करणार आहे.

बॉलिवूडची ड्रीम गर्ल दीपिका पादुकोण आणि ‘सुल्तान’ सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी दुहेरी आनंदाची बातमी आहे. लवकरच ‘बिग बॉस’चे दहावे सीझन सुरू होत आहे. या सीझनच्या पहिल्याच भागात दीपिका सलमानसोबत स्टेज शेअर करताना दिसणार आहे. कशासाठी? तर तर तिच्या हॉलिवूडपटाच्या ट्रेलर लाँचसाठी. होय, ‘बिग बॉस’मध्ये दीपिका   ‘ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ झेंडर केज’ या तिच्या हॉलिवूडपटाचे ट्रेलर लॉन्च करणार आहे. भारतीय टीव्ही इतिहासातील सर्वांत यशस्वी रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या स्टेजवर प्रथमच एखाद्या हॉलिवूडपटाचे ट्रेलर लाँच करण्यात येत आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील सर्व यशस्वी चित्रपटनिर्माते ‘बिग बॉस’च्या घरात येऊन आपल्या चित्रपटाचे  प्रमोशन करीत होते. पण प्रथमच या घरात ‘ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ झेंडर केज’च्या भारतीय भाषेमधील रूपांतरणाचे ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात दीपिका प्रसिद्ध अ‍ॅक्शन स्टार विन डिजेलच्या अपोझिट पहायला मिळणार आहे. सलमान व दीपिका एकमेकांचे प्रसंशक असून अनेकदा त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आतापर्यंत त्यांना एकत्र काम करता आले नाही. चाहते दोघांना एकत्र पाहता यावे यासाठी उत्सुक आहेत. मोठ्या पडद्यावर सलमान-दीपिका या जोडीला सध्या एकत्र पाहणे शक्य नसले तरी लहान पडद्यावर त्यांना एकत्र पाहता येणार आहे. ‘ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ झेंटर केज’ हा दीपिकाचा पहिला हॉलिवूडपट असल्याने देश-विदेशातील सिने जगतामध्ये सध्या तिची चर्चा सुरू आहे.