Join us

सलमान खानला ‘या’ सुपरहिट अभिनेत्रीने नेहमीच दाखविला ठेंगा; आता ‘किक-२’ मध्ये जमणार काय जोडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 10:26 IST

सलमान खान बॉलिवूडचा असा सुपरस्टार आहे, ज्याच्यासोबत काम करण्यास इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्री उत्सुक असते. मात्र तुम्हाला माहिती आहे काय ...

सलमान खान बॉलिवूडचा असा सुपरस्टार आहे, ज्याच्यासोबत काम करण्यास इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्री उत्सुक असते. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री अशीही आहे, जिने एक-दोनदा नव्हे तर कित्येकदा सलमानसोबत काम करण्याची आॅफर नाकारली आहे? होय, कदाचित यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. आता तुम्ही विचार करीत असाल की ही अभिनेत्री कोण? तर ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून, बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आहे. जेव्हा दीपिका तिचे शिक्षण पूर्ण करीत होती, तेव्हापासून तिला सलमानसोबत काम करण्याच्या आॅफर्स मिळत आहेत. मात्र त्यावेळी दीपिकाला असे वाटत होते की, तिचे वय फारच कमी असून, एवढ्या कमी वयात अभिनेत्री बनू नये. ज्यामुळे त्यावेळी दीपिकाने सलमानसोबत काम करण्यास नकार दिला होता. अशातही भाईजान ‘किक’सारख्या सुपरहिट चित्रपटात दीपिकाला आॅफर दिली. परंतु काही कारणामुळे या चित्रपटातही तिला सलमानसोबत स्क्रिन शेअर करता आली नाही. मात्र आता दीपिका-सलमान ही जोडी एकत्र येण्याचे योग जुळताना दिसत आहेत. होय, सलमान आणि दीपिका आगामी ‘किक-२’मध्ये बघावयास मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानने ‘किक-२’च्या शूटिंगला सुरुवात केली. मात्र आता या चित्रपटात दीपिकाच्या नावाची जोरदार चर्चा रंगत आहे.  खरंच दीपिका या चित्रपटाचा भाग बनणार काय? हा मात्र अजूनही प्रश्नच आहे. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटातून जॅकलीन फर्नाडिसचा पत्ता कट करून त्याठिकाणी दीपिकाला संधी दिली जाणार आहे. परंतु याबाबतची कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, चित्रपटास सलमान व्यतिरिक्त बॉबी देओल, अनिल कपूर यांची नावे निश्चित समजली जात आहे. परंतु इतर स्टारकास्टची साजिद नाडियाडवाला यांनी अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा केलेली नाही.