Join us
Daily Top 2Weekly Top 5

अलिजा अग्निहोत्रीचे होणार ग्रॅण्ड लॉन्चिंग! मामू सलमानचा आहे हा खास प्लान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 09:50 IST

सलमान खानची भाची अलिजा अग्निहोत्री हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण आता या डेब्यूची तयारी सुरू झाली आहे.

सलमान खानची भाची अलिजा अग्निहोत्री हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण आता या डेब्यूची तयारी सुरू झाली आहे.सलमानची हिट फ्रेन्चाईजी ‘दबंग 3’ मधून अलिजा डेब्यू करणार अशी चर्चा होती. पण आता एक वेगळीच बातमी कानावर येतेय. होय, बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, अलिजा ‘दबंग3’मधून नाही तर तिच्यासाठी खास प्रोजेक्ट डिझाईन केला जात आहे.

खान कुटुंबाशी जुळलेल्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अलिजा लवकरचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार, ही बातमी खरी आहे. पण ती ‘दबंग 3’मधून डेब्यू करणार, या बातमीत काहीही तथ्य नाही. सध्या अलिजा डान्स आणि अ‍ॅक्टिंगचे धडे गिरवतेय. सलमान खान स्वत: तिच्या या सगळ्या तयारीवर लक्ष ठेवून आहे. त्याला अलिजासाठी परफेक्ट लॉन्च हवा आहे आणि त्यामुळेच तो तिच्यासाठी वेगवेगळ्या स्क्रिप्ट वाचत आहे. ‘दबंग 3’ हा पहिल्या चित्रपटाचा प्रीक्वल आहे. त्यामुळे यात अलिजा फिट होण्याचा कुठलाही चान्स नाही.सलमान खान नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी ओळखला जातो. यापूर्वीही त्याने अनेक नव्या चेह-यांना लॉन्च केले आहे. ‘दबंग’मधून त्याने सोनाक्षी सिन्हाला लॉन्च केले होते. याशिवाय अशिया शेट्टी, डेजी शाह, सूरज पांचोली, वरिना हुसैन यांनाही त्याने लॉन्च केले आहे. अगदी अलीकडे बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्माला सलमानने लॉन्च केले होते. लवकरच सलमान आपल्या मित्राचा मुलगा जहीर इकबाल आणि अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनुतन बहल हिला लॉन्च करणार आहे.

टॅग्स :सलमान खान