सलमान खानच्या ‘या’ हिरोईनवर कोसळला दु:खाचा डोंगर! मल्टिप्लेक्स मालकांनी चित्रपट दाखवण्यास दिला नकार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 15:59 IST
विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘१९२१’ हा चित्रपट आज १२ जानेवारीला रिलीज झालाय. पण रिलीजसोबतच या चित्रपटाच्या अडचणीही वाढल्या आहेत. होय, ...
सलमान खानच्या ‘या’ हिरोईनवर कोसळला दु:खाचा डोंगर! मल्टिप्लेक्स मालकांनी चित्रपट दाखवण्यास दिला नकार!!
विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘१९२१’ हा चित्रपट आज १२ जानेवारीला रिलीज झालाय. पण रिलीजसोबतच या चित्रपटाच्या अडचणीही वाढल्या आहेत. होय, याच अडचणींमुळे हा चित्रपट अनेक मल्टिप्लेक्समध्ये रिलीज होऊ शकला नाही. या चित्रपटात लीड रोल साकारणारी अभिनेत्री जरीन खान हिच्यासाठी यापेक्षा वाईट बातमी कुठली असू शकते? देशातील चार मोठ्या मल्टिप्लेक्सने जरीन खानच्या ‘१९२१’वर बहिष्कार टाकला आहे. याला तुम्ही मल्टिप्लेक्स कंपन्यांची दादागिरीही म्हणू शकता. प्राप्त माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी संबंधित चार मल्टिप्लेक्स मालकांनी ‘१९२१’च्या निर्मात्यांना चित्रपट रिलीज झाल्याच्या आठ आठवड्यांपर्यंत याचे सॅटेलाईट अधिकार कुठल्याही चॅनलला न विकण्याची अट घातली होती. अर्थात ‘१९२१’च्या निर्मात्यांनी मल्टिप्लेक्स मालकांची ही मनमानी मानण्यास नकार दिला होता. याचा परिणाम म्हणजे, या चारही मल्टिप्लेक्सने ‘१९२१’ दाखवण्यास नकार दिला. त्यामुळे या चारही मल्टिप्लेक्सच्या स्क्रिनवर ‘१९२१’ पे्रक्षक पाहू शकले नाहीत. ‘१९२१’च्या निर्मात्यांच्या मते, ही मल्टिप्लेक्स मालकांची दादागिरी आहे. लहान चित्रपटांची लागत त्याचे सॅटेलाईट अधिकार विकून वसूल केली जाते. त्यामुळे मल्टिप्लेक्स मालक यात आडकाठी आणत असतील तर ते चुकीचे आहे. याआधीही ‘शादी में जरूर आना’, ‘तुम्हारी सुलू’ आणि ‘द हाऊस नेक्स्ट डोर’ या चित्रपटांनाही मल्टिप्लेक्स मालकांच्या अशाच दांडगाईला समोर लावे लागले होते. ‘१९२१’या चित्रपटात जरीन खान व करण कुंद्रा लीड रोलमध्ये आहेत. जरीनचा हा पहिला हॉररपट आहे. ALSO READ : ‘१९२१’ या हॉरर सिनेमाच्या शूटींगदरम्यान कॅमे-यात कैद झाले भूत!‘१९२१’ हा चित्रपट ‘१९२0’चा सीक्वल आहे. ‘१९२0’प्रमाणेच या चित्रपटात एक रोमॅन्टिक आणि इमोशनल कथा पे्रक्षकांना पाहायला मिळतेय. विक्रम भट्ट यांनी सन २००२ मध्ये ‘राज’पासून भयपटांची सुरुवात केली होती. ‘राज’ या चित्रपटात बिपाशा बसू आणि डिनो मोरिया लीड रोलमध्ये होते. २००८ मध्ये विक्रम यांचा ‘१९२0’ रिलीज झाला होता. २०१० मध्ये ‘शापित’ आणि २०११ मध्ये ‘हॉन्टेड’ हा पहिला ३ डी हॉरर सिनेमा विक्रम भट्ट घेऊन आले होते.