बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' (Sikandar Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच भाईजानचा एक फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे. असे सांगितले जात आहे की हा फोटो त्याच्या हॉलिवूड चित्रपटाचा आहे, ज्यामध्ये तो एक छोटी भूमिका साकारणार आहे. लीक झालेल्या या फोटोमध्ये अभिनेता दमदार भूमिकेत दिसत आहे. आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आणि संजय दत्त १२ वर्षांनंतर एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या वृत्तामुळे चाहते खूप उत्सुक आहेत आणि दोन्ही सुपरस्टार्सना एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत. मात्र, असे बोलले जात आहे की, दोन्ही स्टार्सची भूमिका खूपच लहान असणार आहे. या चित्रपटात दोघेही केमिओ करताना दिसणार आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सलमान खान कोट आणि पँटमध्ये दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ पाहून कळत आहे की, हा सेटअप एका घरातील ओपन बाल्कनीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये अनेक घरेही दिसत आहेत. समोर एक रस्ताही दिसतो, तिथे दुकानेही आहेत. ज्या चित्रपटाच्या सेटवरून भाईजानचा हा लूक लीक झाला आहे, त्याला चाहते 'द सेव्हन डॉग्स' म्हणत आहेत. सध्या सलमान खान त्याच्या सिकंदर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच रश्मिका मंदानासोबत दिसणार आहे. एआर मुरुगादास दिग्दर्शित हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे. या दोघांसोबत काजल अग्रवाल, सत्यराज, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.