३० वर्षांनंतर सलमान खानचा खुलासा; पुन्हा ‘ही’ चूक करू इच्छित नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 21:59 IST
बॉलिवूडमध्ये सुपरस्टार सलमान खानची ताकद काय आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. ३० वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये दबंग खानने एकपेक्षा ...
३० वर्षांनंतर सलमान खानचा खुलासा; पुन्हा ‘ही’ चूक करू इच्छित नाही!
बॉलिवूडमध्ये सुपरस्टार सलमान खानची ताकद काय आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. ३० वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये दबंग खानने एकपेक्षा एक चित्रपट केले. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून सलमानला खºया अर्थाने ओळख आणि लोकप्रियता मिळाली. पुढे लोकप्रियतेचा हा सिलसिला कायम राहिला. आज सलमानला इंडस्ट्रीमधील सर्वांत यशस्वी अभिनेता म्हणून बघितले जाते. वादग्रस्त आयुष्य ठरूनही सलमान प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. दरम्यान, लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या सलमानने त्याच्या आयुष्याशी संबंधित नुकताच एक खुलासा केला. सलमानने त्याच्या आयुष्यातील त्या ‘हिचकी’बद्दल सांगितले जे विसरून त्याने पुढे जाणेच संयुक्तिक समजले. या अगोदर अभिनेता शाहरूख खान, अजय देवगण, अनिल कपूर आणि कॅटरिना कैफ यांसारख्या स्टार्सनी आपल्या आयुष्याशी संबंधित काही सिक्रेटचा खुलासा केला. आता या लिस्टमध्ये सलमान खानचे नावही जोडले गेले आहे. सध्या सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यामध्ये सलमान आपल्या आयुष्याशी निगडीत एका सिक्रेटबद्दल खुलासा करताना दिसत आहे. सलमानने म्हटले की, ‘३० वर्षांपूर्वी मी माझ्या कामाबद्दल कधीच गंभीर नसायचो. मात्र आता मी माझ्या कामाबद्दल पहिल्यापेक्षा अधिक फोकस करतो. मला याबाबतची जाणीव झाली आहे की, कामापेक्षा दुसरे काहीच चांगले नाही. यावेळी सलमानने लोकांना विनंती करताना म्हटले की, तुम्ही सर्व आपल्या कामाबद्दल गंभीर असायला हवेत. त्याचबरोबर आपल्या कामाप्रती गौरव वाटायला हवा. सलमान सध्या ‘रेस-३’च्या शूटिंगमध्ये अबुधाबी येथे व्यस्त आहे. अशातही सलमान केवळ मैत्रीखातर राणी मुखर्जीच्या आगामी ‘हिचकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग बनला. केवळ राणीच्या चित्रपटाचे प्रमोशनच नाही तर, तो यूजर्सकडून जॅकलीन फर्नांडिसचा बचावही करताना बघावयास मिळत आहे. वास्तविक यूजर्सनी सलमानवरही निशाणा साधला आहे. सध्या जॅकलीन तिच्या ‘एक दोन तीन’ या गाण्यावरून चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. अर्थात ही प्रसिद्धी नकारात्मक आहे. प्रेक्षकांना जॅकलीनचा अंदाज अजिबातच पसंत आला नाही. प्रेक्षकांनी जॅकलीनला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अशात सलमान खान तिच्या बचावासाठी पुढे आला आहे. मात्र ट्रोलर्सनी सलमानवरही निशाणा साधला आहे.