Join us

सलमान खानच्या ‘या’ दबंग अभिनेत्रीचा पाहा डॅशिंग अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 20:48 IST

सलमान खानची ही अभिनेत्री सध्या बॅँकॉकमध्ये असून, तिचा हा अंदाज चांगलाच पसंत केला जात आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘रेस-३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या बॅँकॉक येथे असून, चित्रपटातील इतर स्टारकास्ट त्याच्यासोबत आहे. याचदरम्यान त्याच्या अभिनेत्रीचा एक डॅशिंग अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. होय, सलमानसोबत ‘जय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाºया डेजी शहाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो डेजीनेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून, फोटोमध्ये ती चक्क एका वाघाच्या बछड्याला बाटलीने दूध पाजताना दिसत आहे. ‘रेस-३’मध्ये डेजीचीही महत्त्वाची भूमिका असून, सध्या ती याच चित्रपटाच्या शूटिंगसाठी बॅँकॉकला आहे. डेजीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून तिचा हा डॅशिंग अंदाज चांगलाच पसंत केला जात आहे. दरम्यान, ‘रेस-३’ हा सलमानसोबतचा डेजीचा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा करीत आहे. डेजीला या चित्रपटातून प्रचंड अपेक्षा असून, तिच्या करिअरला चित्रपटाच्या माध्यमातून ब्रेक मिळेल असा तिला विश्वास आहे. डेजीला बॉलिवूडमध्ये आणण्यात सलमानचाच हात असल्याचे बोलले जाते. सलमाननेच तिला बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. मात्र अशातही तिचे करिअर म्हणावे तसे ट्रॅकवर आलेले नाही. त्यामुळे हा चित्रपट हिट झाल्यास डेजीच्या करिअरला वळण मिळेल यात शंका नाही.  दरम्यान, २००८ मध्ये आलेल्या ‘रेस’ या चित्रपटाच्या सिरीजचा हा तिसरा चित्रपट आहे. यात जॅकलिन फर्नांडिस आणि अनिल कपूर सोडल्यास कलाकारांची संपूर्ण टीम नवी आहे. बॉबी देओल, साकिब सलीम यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. मध्यंतरी चित्रपटात जॅकलीनऐवजी दीपिका पादुकोणच्या नावाची चर्चा होती. मात्र अद्यापपर्यंत याविषयी अधिकृतरीत्या घोषणा केली नसल्याने ही चर्चाच ठरताना दिसत आहे. जर दीपिका या चित्रपटाचा भाग बनली तर पहिल्यांदाच सलमान आणि ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.