Join us

सलमान खानच्या दबंग 3 चे दिग्दर्शन करणार 'हा' खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 12:02 IST

सलमान खानच्या सुपरहिट चित्रपट दबंगचा रिमेक दबंग-3 गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. कधी चित्रपटाच्या स्क्रिप्टला घेऊन तर ...

सलमान खानच्या सुपरहिट चित्रपट दबंगचा रिमेक दबंग-3 गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. कधी चित्रपटाच्या स्क्रिप्टला घेऊन तर कधी अभिनेत्रीला घेऊन या ना त्या कारणामुळे चित्रपट नेहमीच चर्चेत असतो. आता याच चित्रपटाला घेऊन आणखीन एक खबर आली आहे. मुन्ना मायकलनंतर सबीर खान दबंग-3 चे ही दिग्दर्शन करणार आहे.  मुंबई मिररशी बोलताना सबीर खानने या गोष्टीची पुष्टी केली आहे. सबीर म्हणाला,  हो मी दबंग 3 दिग्दर्शन करण्याचा प्लॉन करतो आहे. मात्र या व्यतिरिक्त कोणतिही माहिती अजून मी देऊ शकतं नाही आहे. कारण अजून काही कागद पत्रांवर सही करणे बाकी आहेत. मी खूप खूश आहे की दबंग 3च्या दिग्दर्शनासाठी माझी निवड करण्यात आली. मला आशा आहे की चुलबुल पांडेच्या भूमिकेला मी अधिक मनोरंजक स्वरुपात लोकांसमोर आणणे. सबीर खानने आपल्या करिअरची सुरुवात कमबख्त इश्क या चित्रपटातून केली आहे. यात अक्षय कुमार आणि करिना कपूर यांची मुख्य भूमिका होती. यानंतर त्यांने हीरोपंती, बागी आणि आता मुन्ना मायकल सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.   दबंग, दबंग 2चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. मात्र यावेळी सलमान खान ही संधी दुसऱ्या कोणाला देऊ इच्छितो. दबंग3च्या दिग्दर्शकाचे नाव नक्की झाल्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होईल. यात सलमान सोबत सोनाक्षी सिन्हा ही झळकणार आहे. सलमानचे फॅन्स 'दबंग 3'ची वाट मोठ्या आतुरतेने पाहत असतील यात काही शंका नाही.