Join us

सलमानच्या रागीट स्वभावामुळे वयस्कर लाइटमॅन झालेले जखमी, 'हम दिल दे चुके सनम' अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:41 IST

Salman Khan : 'हम दिल दे चुके सनम'च्या सलमान खान सेटवर कसा वागायचा आणि त्यावेळी तो किती रागावला होता, याचा खुलासा नुकतेच त्याच्या सहकलाकाराने केला आहे.

१९९९ साली प्रदर्शित झालेला 'हम दिल दे चुके सनम' (Hum Dil De Chuke Sanam) हा चित्रपट प्रेक्षक कितीही वेळा पाहत असले तरी ते कधीही कंटाळत नाहीत. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित या चित्रपटात लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या जोडीने चाहत्यांची मने जिंकली. या चित्रपटातील गाण्यांपासून ते त्याच्या कथेपर्यंत, प्रेक्षकांना तो खूप आवडला. चित्रपटात सलमान खानने साकारलेला समीर त्याची नंदिनीला (ऐश्वर्या राय) गमावल्यानंतर त्याचा राग गिळताना दिसला, परंतु वास्तविक जीवनात भाईजानने त्यावेळी सेटवर आपला राग अजिबात आवरला नाही. सलमान खान सेटवर कसा वागायचा आणि त्यावेळी तो किती रागावला होता, याचा खुलासा नुकतेच त्याच्या सहकलाकाराने केला आहे.

झी 5 वरील 'बकैती' या नवीन सीरिजमध्ये दिसणारी अभिनेत्री शीबा चड्ढाने अलीकडेच सिद्धार्थ कन्ननशी झालेल्या मुलाखतीत तिच्या 'हम दिल दे चुके सनम' या पहिल्या चित्रपटातील एक किस्सा सांगितला. तिने सेटवर प्रत्येक कलाकार कसा वागायचा हे सांगितले. सलमान खानशी संबंधित एक किस्सा शेअर करत अभिनेत्रीने सांगितले की, "मला आठवते की एकदा तो अडखळला आणि पडला. रागाने सेटवरून निघून गेला. त्याने रागाने अशा प्रकारे दार लावले की दारामागे उभ्या असलेल्या एका वयस्कर लाईटमनला थोडी दुखापत झाली. ते वातावरण पाहून मी म्हणाले, स्टार्ससोबत काम करताना असे घडते.

सलमानने शीबाला मिठी मारण्यास दिलेला नकारशीबा चड्ढाने 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील त्या दृश्याबद्दलही सांगितले जिथे सलमान खानला चित्रपटात तिला मिठी मारायची होती, परंतु भाईजानने ते करण्यास नकार दिला. ती म्हणाली, "त्याला मला मिठी मारायची होती, पण त्याने लगेच सांगितले की मी ते करणार नाही". अभिनेत्रीने सांगितले की जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली, तेव्हा संजय लीला भन्साळी यांनी हस्तक्षेप केला आणि त्याला समजावून सांगितले की, त्याला हे करावे लागेल कारण ती पटकथेसाठी गरजेचं होतं.

वर्कफ्रंटशीबा चड्ढाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती लवकरच रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या चित्रपटात दिसणार आहे. 'रामायण भाग १'मध्ये ती 'मंथरा'ची भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चन