Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सलमान खानच्या शिक्षेवर बॉलिवूडच्या अनेकांनी व्यक्त केले दु:ख; मात्र ‘या’ अभिनेत्रीला झालायं आनंद!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 12:15 IST

सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावल्यामुळे बॉलिवूड दु:खी असताना भारतीय वंशाची ब्रिटीश नागरिक आणि अभिनेत्री व मॉडेल सोफिया हयात ...

सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावल्यामुळे बॉलिवूड दु:खी असताना भारतीय वंशाची ब्रिटीश नागरिक आणि अभिनेत्री व मॉडेल सोफिया हयात हिने मात्र सलमानच्या शिक्षेवर आनंद व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवर याबाबत आनंद व्यक्त करणारा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. शिवाय एक लांबलचक पोस्टही शेअर केली आहे. ‘अखेर वाईट कर्माचे शिक्षा मिळतेच...’ असे या पोस्टच्या शेवटी तिने लिहिले आहे.‘अनेक लोक सलमानविरोधात बोलायला घाबरतात. आपण बॉलिवूडला कंट्रोल करतो, अशा अविर्भावात सलमान वावरत असतो. पण मी त्याला मुळी्नच घाबरत नाही. सलमानने जे काही केले, त्यासाठी त्याला शिक्षा मिळाली, हे जाणून मला आनंद होतोय. पृथ्वीवर वन्यजीवांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि निष्पाप वन्यजीवांचा प्राण घेऊन सलमानने खूप वाईट कृत्य केलेय. त्याने केवळ स्वत:चा विचार केला. अनेक मुले, युवा त्याला फॉलो करतात. त्यामुळे समाजाप्रति त्याचे उत्तरदायित्व आहे. अशा चुकीच्या गोष्टी करून तो जगाला काय दाखवू इच्छितो?  केवळ सेलिब्रिटी आहे म्हणून जनावरांना मारूनही सहीसलामत सुटून तो समाजापुढें काय सिद्ध करू इच्छितो?’, असे सोफियाने लिहिले आहे. सोफिया केवळ इथेच थांबली नाही तर तिने पुढेही सलमानविरोधात लिहिले आहे. ‘आज भारताने सिद्ध केले की, व्यक्ति कुणीही असो, कितीही मोठा असो, त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळणारचं. मी अनेकांकडून ऐकलेय, की लोक आरोपींविरोधात पोलिसांत जायला घाबरतात. कारण शक्तिशाली लोक पोलिस, न्यायालये आणि वकीलांना पैसे देऊन सहीसलामत सुटतात. हे माझ्यासोबतही झाले आहे. अरमान कोहलीने माझ्या दोन वकीलांना खरेदी केले होते आणि मी माझी केस लढू शकली नव्हती. डॉली ब्रिंदानेही मला सांगितले होती की, अरमानचे कुटुंब खूप पॉवरफुल आहे. ते एअरपोर्टवर माझ्या बॅगेत ड्रग्ज ठेवू शकते आणि मला जेलमध्ये जावे लागू शकते. यानंतर मला माझी केस मागे घ्यावी लागली होती. मी जे कुणी वकील केले, त्या सगळ्यांना खरेदी केले गेले. आज मात्र भारतीय मान वर करून भारतातही न्याय जिवंत आहे, हे सांगू शकतात. सलमानच्या प्रकरणाने भारतीयांना ही हिंमत दिली आहे. भारत जिंदाबाद, असे म्हणूनचं आज मी म्हणू शकते,’ असे  तिने लिहिले आहे.ALSO READ : ‘ड्रामा क्वीन’ सोफिया हयात होणार आई! हे फोटो आहेत पुरावा!!