Join us

​सलमानमुळे अर्जूनचा पत्ता होणार कट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 19:54 IST

सन १९८३ मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. महान क्रिकेट खेळाडू कपिल देव या विजयाचा शिल्पकार होता. फायनलमध्ये विवियन ...

सन १९८३ मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. महान क्रिकेट खेळाडू कपिल देव या विजयाचा शिल्पकार होता. फायनलमध्ये विवियन रिचर्ड्स याला कपिलनेच कॅच आऊट केले होते. हा एक सोनेरी क्षण होता. या ऐतिहासिक विजयावर आधारित चित्रपटात अर्जून कपूर टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार कपिल देवची भूमिका साकारणार अशी बातमी होती. मात्र आता एक वेगळीच बातमी ऐकायला मिळतेय. होय, या चित्रपटातून अर्जूनचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करेल, अशी माहिती आहे. सूत्रांच्या मते, कबीरने हा चित्रपट दिग्दर्शित केल्यास अर्जून या चित्रपटाचा भाग नसेल. याचे कारण म्हणजे सलमान खान. होय, सलमान अर्जूनला जराही पसंत करत नाही, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. याचे कारण अर्थात अर्जून व सलमानची बहीण अर्पिता यांच्यात एकेकाळी असलेले अफेअर. याच पार्श्वभूमीवर सलमानशी असलेली जवळीक बघता कबीर खान सल्लूला नाराज करू इच्छित नाही. असे झालेच तर अर्जूनच्या हातून एक महत्त्वपूर्ण चित्रपट गेलाच, असेच समजावे लागेल.