सलमान खानसाठी ‘या’ अभिनेत्रीने अवॉर्ड सोहळ्यातून काढला पळ; ट्रॉफीही घेतली नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 18:21 IST
नागिन फेम मौनी रॉय हिला एका फंक्शनमध्ये अवॉर्ड दिला जाणार होता. परंतु यादरम्यान तिच्यासोबत असे काही घडले की, तिने ...
सलमान खानसाठी ‘या’ अभिनेत्रीने अवॉर्ड सोहळ्यातून काढला पळ; ट्रॉफीही घेतली नाही!
नागिन फेम मौनी रॉय हिला एका फंक्शनमध्ये अवॉर्ड दिला जाणार होता. परंतु यादरम्यान तिच्यासोबत असे काही घडले की, तिने अवॉर्ड घेणे महत्त्वाचे समजले नाही. त्याचे झाले असे की, ज्या दिवशी हा समारंभ आयोजित केला होता त्याच दिवशी (२७ डिसेंबर) बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा बर्थ डे होता. सलमानने त्याच्या फॅमिली मेंबर्स आणि जवळच्या मित्रांना त्याच्या पनवेल येथील फार्महाउसवर एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सलमानने मौनी रॉयलाही आमंत्रित केले होते. त्यामुळे तिने अवॉर्ड अर्ध्यातच सोडून सलमानच्या बर्थ डेला हजेरी लावणे पसंत केले. एका एंटरटेन्मेंट वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, 'Bright Perfect Achievers Awards' मध्ये मौनी रॉय उपस्थित होती. मात्र तिला सलमानच्या बर्थ डे पार्टीला जायचे असल्याने तिने अवॉर्ड कार्यक्रम अर्ध्यातच सोडून दिला. दरम्यान, मौनीने अवॉर्ड नाइटमध्ये रेड कारपेटवर आपला जलवा दाखविला. त्याचबरोबर मीडियाशी संवादही साधला. परंतु अवॉर्ड सुरू होण्याअगोदरच तिने तेथून काढता पाय घेतला. सूत्रानुसार, इव्हेंट सुरू होण्याअगोदरच मौनीने आयोजकांना अवॉर्ड घेणार नसल्याचे सांगत तेथून जाणे पसंत केले. ‘नागिन’ आणि ‘नागिन-२’ या मालिकांमधून मौनीला जबरदस्त लोकप्रियता मिळाली आहे. सध्या मौनी बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. ‘गोल्ड’ हा तिचा पहिला बॉलिवूड प्रोजेक्ट असून, त्यात ती आपला जलवा दाखविताना दिसणार आहे. हा चित्रपट १९४८ मध्ये लंडन येथे झालेल्या आॅलिम्पिकवर आधारित आहे. भारताचा पहिला गोल्ड विनर आणि हॉकी लिजेंड बलबीर सिंग यांची कथा या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. चित्रपटात अक्षयकुमार लीड रोलमध्ये असून, मौनी व्यतिरिक्त अमित साध, कुणाल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सूत्रानुसार मौनीला ही भूमिका सलमानच्या सांगण्यावरून मिळाली आहे. त्याचबरोबर मौनी सलमानसोबत ‘दबंग-३’मध्ये सोनाक्षीला रिप्लेक्स करणार असल्याचीही चर्चा आहे.