सलमान खान लवकरच ‘नो एंट्री’च्या सीक्वलमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 20:55 IST
सुल्ताननंतर आता अभिनेता सलमान खान लवकरच ‘नो एंट्री’च्या सीक्वलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. निर्माता बोनी कपूर लवकरच सलमानसोबत ‘नो एंट्री’च्या ...
सलमान खान लवकरच ‘नो एंट्री’च्या सीक्वलमध्ये...
सुल्ताननंतर आता अभिनेता सलमान खान लवकरच ‘नो एंट्री’च्या सीक्वलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. निर्माता बोनी कपूर लवकरच सलमानसोबत ‘नो एंट्री’च्या सीक्वलबाबत चर्चा करणार आहे. सिनेमाचे शूटिंग हे सलमानशी बोलणे झाल्यावरच सुरू होईल असं बोनी कपूरनं सांगितलं आहे.फिल्म दिग्दर्शक अनीज बज्मीनी सलमानला 'नो एंट्री' च्या सीक्वलची स्टोरी सांगितली व सलमानला ती आवडलीदेखील होती. सलमानसोबतच या सीक्वलमध्ये अनिल कपूर आणि फरदीन खानदेखील असणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटात एकूण ९ अभिनेत्री असणार आहेत. मात्र सलमानशी बोलणे झाल्यावरच या अभिनेत्रींशी बोलणे होईल.