Join us
Daily Top 2Weekly Top 5

-अन् सलमान खानने स्वत:लाच मारले चाबकाचे फटके, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 12:16 IST

‘त्यांच्या वेदना वाटून घेण्यात आनंदच आहे...,’असे कॅप्शन देत सलमानने हा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय कृपया लहान मुलांनी माझ्या या कृतीचे अनुकरण करू नये, असा इशाराही दिला आहे. 

ठळक मुद्दे सलमानच्या या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 1 तासात जवळपास 7 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

ढोलकीच्या आवाजावर नाचत स्वत:च्या पाठीवर चाबकाचे फटके मारून घेणारा पोतराज पाहिला की, अंगावर काटा येतो. पूर्वीच्या काळी दृष्काळ, साथीचे रोग अशी संकटे देवीचा कोप मानला जाई. यासाठी देवीला शांत केल्याशिवाय हा कोप थांबणार नाही, अशी मान्यता होती. देवीला कोप झाला की, तिला शांत करण्यासाठी आणि तिची माफी मागण्यासाठी पोतराज स्वत:ला चाबकाने फोडून लोकांच्या वेदना आपल्या अंगावर घेत आणि यामोबदल्यात लोक त्यांना धान्य वा पैशाच्या रूपात दान देत. बदलत्या काळासोबत पोतराज लुप्त होत चालले आहेत. पण अद्यापही काही ठिकाणी पोतराज दिसतात. बॉलिवूडचा दबंग खान सलमान यालाही अशाच एका पोतराजांचे दर्शन घडले आणि पुढे जे काही झाले ते पाहून सगळेच अवाक झालेत.

होय, सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो पोजराजांसोबत बोलताना दिसत आहे. ‘फटका पडता है क्या?’ असा प्रश्न तो करतो आणि मग, या फटक्याच्या वेदना नेमक्या कशा असतात, हे जाणून घेण्यासाठी स्वत:वरही चाबकाचे फटके मारून घेतो. भाईजान स्वत: चाबकाचे फटके मारून घेतो म्हटल्यावर सर्व टाळ्या वाजवतात. पोतराजांच्या चेह-यावरही कुतूहल दिसते. यानंतर सलमान पोतराजांसोबत फोटोही काढतो.

‘त्यांच्या वेदना वाटून घेण्यात आनंदच आहे...,’असे कॅप्शन देत सलमानने हा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय कृपया लहान मुलांनी माझ्या या कृतीचे अनुकरण करू नये, असा इशाराही दिला आहे.  सलमानच्या या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 1 तासात जवळपास 7 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सलमान सध्या ‘दबंग 3’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. यानंतर तो बिग बॉसचे नवे सीझन होस्ट करताना दिसणार आहे.

टॅग्स :सलमान खान