Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाई, कौनसा न्यूजपेपर आता है! अटलजींबद्दल ट्विट करून फसला सलमान खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 09:08 IST

 ‘भारत’च्या शूटींगमध्ये व्यस्त असलेला सलमान खान सध्या ट्रोल होतोय. याचे कारण आहे, त्याने केलेले एक ट्विट. 

 ‘भारत’च्या शूटींगमध्ये व्यस्त असलेला सलमान खान सध्या ट्रोल होतोय. याचे कारण आहे, त्याने केलेले एक ट्विट. होय, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या पाच दिवसानंतर सलमानला जाग आली आणि त्याने शोक व्यक्त केला. यानंतर नेटकऱ्यांनी सलमानची चांगलीचं मजा घेतली. काल मंगळवारी सलमानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अटलबिहारी वाजपेयींच्या निधनावर दु:ख व्यक्त करणारे ट्विट केले. ‘एक दिग्गज राजकीय नेते, एक प्रभावी वक्ते आणि एक असामान्य व्यक्तिमत्त्व अटलजींच्या निधनामुळे दु:खी आहे, ’ असे ट्विट त्याने केले. त्याच्या या ट्विटनंतर अनेक युजर्सनी सलमानला नाही, नाही ते सुनावले.

 ‘खूप दिवसानंतर आठवले सर,’असे एका युजरने लिहिले. तर दुस-याने ‘टायगर सो रहा था’, अशा उपहासात्मक शब्दात प्रतिक्रिया दिली. ‘भाई, कौन सा न्यूजपेपर आता है,’असा सवाल एका युजरने केला. 

एकाने  ‘भाई को न्यूज मिल ही गई, कौनसा न्यूजपेपर आता है,’ असे लिहिले तर एकाने ‘भाई, आपने बहोत देर कर दी, न्यूजपेपर बदलो अपना,’ असा सल्ला सलमानला दिला. विशेष म्हणजे, एका युजरने सलमानने केलेल्या या ट्विटमधील स्पेलिंग मिस्टेकही पकडली.

 होय, सर,feeing नाही  feeling , याकडे एका युजरने भाईचे लक्ष वेधले. या प्रतिक्रियांनी लोकांचे चांगलेच मनोरंजन केले. सलमानची यावरची प्रतिक्रिया मात्र अद्याप कळली नाही.सलमान सध्या ‘भारत’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्या अपोझिट कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे.

टॅग्स :सलमान खान