ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक होती. पण दोन दिवसांपूर्वी देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला. धर्मेंद्र यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच उपचार सुरु आहेत. अशातच धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? याविषयी पहिल्यांदाच सलमान खानने खुलासा केला.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल सलमान खान काय म्हणाला?
सलमान खान सध्या 'दबंग टूर' निमित्त कतारला आहे. त्यावेळी एका व्यक्तीने सलमान खानला त्याच्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्ती कोण? असं विचारलं. तेव्हा सलमानने धर्मेंद्र यांचं नाव घेतलं. त्याचवेळी सलमान काहीसा भावुक झाला आणि म्हणाला, ''माझ्या आधी एकच व्यक्ती होते ते म्हणजे धर्मेंद्र जी. ते माझे वडील आहेत. ही एकच गोष्ट आहे, ज्यामुळे मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. मला हीच आशा आहे की ते लवकर बरे होतील.'' अशाप्रकारे सलमान खानने भावुक शब्दात धर्मेंद्र यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.''
धर्मेंद्र जेव्हा रुग्णालयात दाखल झाले तेव्हा हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला जाणारा पहिला व्यक्ती होता तो म्हणजे सलमान खान. धर्मेंद्र सलमानला त्याचा मुलगा मानतात. याशिवाय भविष्यात कधी माझ्यावर बायोपिक झाला तर सलमानने काम करावं, अशी धर्मेंद्र यांची इच्छा आहे.
आता कशी आहे धर्मेंद्र यांची प्रकृती?
धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतित समदानी यांनी विक्की लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, धर्मेंद्र यांचे दोन्ही मुलं सनी आणि बॉबी देओल आणि पत्नी प्रकाश कौर यांची इच्छा होती की धर्मेंद्र घरी परत यावेत आणि त्यांच्यासोबत वेळ घालवावा. त्यामुळे धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. प्रतित समदानी म्हणाले, "स्पष्टपणे, काही कारणामुळे दोन्ही भाऊ आणि त्यांची आई प्रकाश कौर यांची इच्छा होती की धर्मेंद्र यांनी त्यांच्या घरी परतावे आणि तिथे त्यांच्यासोबत राहावे, जिथे त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग घालवला आहे." त्यामुळे धर्मेंद्र यांची प्रकृती आता सुधारत आहे असं म्हणता येईल.
Web Summary : Salman Khan shared an emotional update on Dharmendra's health during a tour. He expressed his love and admiration for the veteran actor, wishing him a speedy recovery. Dharmendra is currently recovering at home under medical supervision.
Web Summary : सलमान खान ने एक कार्यक्रम के दौरान धर्मेंद्र के स्वास्थ्य पर एक भावुक अपडेट साझा किया। उन्होंने दिग्गज अभिनेता के प्रति अपना प्यार और प्रशंसा व्यक्त करते हुए उनके शीघ्र स्वस्थ होने की कामना की। धर्मेंद्र फिलहाल घर पर चिकित्सकीय देखरेख में ठीक हो रहे हैं।