सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान'ची रिलीज डेट बदलण्याची शक्यता आहे. हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात येणार होता. मात्र, ताज्या माहितीनुसार चित्रपटाचे काही भागांचे चित्रीकरण अद्याप बाकी असून काही सीन्स रिशूट करण्यात येणार आहेत. हे शूट ९ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होणार आहे. यामुळेच निर्मात्यांना १७ एप्रिलची डेडलाईन गाठणे सध्या कठीण वाटत आहे.
चित्रपट लांबणीवर पडण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचे तांत्रिक सोपस्कार आणि सुरक्षा प्रोटोकॉल. हा चित्रपट भारतीय लष्कराच्या शौर्यावर आधारित असल्याने प्रदर्शनापूर्वी त्याचा 'फायनल कट' संरक्षण मंत्रालयाला (Ministry of Defence) दाखवला जाणार आहे. मंत्रालयाच्या स्क्रीनिंग प्रक्रियेला आणि त्यानंतर आवश्यक असल्यास होणाऱ्या बदलांना वेळ लागू शकतो. परिणामी, एडिटिंग आणि पोस्ट-प्रॉडक्शनचे काम वेळेत पूर्ण होणे अशक्य दिसत असल्याने प्रदर्शनाची तारीख बदलण्याचे संकेत मिळत आहेत.
दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा हा चित्रपट २०२० मधील भारत-चीन गलवान संघर्षावर आधारित आहे. यात सलमान खानसोबत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत असून, चित्रपटाची कथा शिव अरूर आणि राहुल सिंह यांच्या 'इंडियाज मोस्ट फिअरलेस ३' या पुस्तकावरून घेण्यात आली आहे. अद्याप रिलीज डेटबद्दल अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी या तांत्रिक कारणांमुळे चाहत्यांना 'भाईजान'च्या या मोठ्या चित्रपटासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.
Web Summary : Salman Khan's 'Battle of Galwan' release may be delayed due to pending shoots, reshoots, and Ministry of Defence screening. Technical procedures impacting the release date for fans.
Web Summary : सलमान खान की 'बैटल ऑफ गलवान' की रिलीज लंबित शूट, रीशूट और रक्षा मंत्रालय की स्क्रीनिंग के कारण स्थगित हो सकती है। तकनीकी प्रक्रियाएं प्रशंसकों के लिए रिलीज की तारीख को प्रभावित कर रही हैं।