Join us

असं पहिल्यांदाच घडणार! सलमानचा 'सिकंदर' रविवारी रिलीज होणार; तारीख आली समोर

By देवेंद्र जाधव | Updated: March 19, 2025 09:17 IST

सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा कधी रिलीज होणार, याचा खुलासा अखेर झाला असून रिलीज डेट समोर आली आहे (sikandar salman khan)

सलमान खानच्या (salman khan) आगामी 'सिकंदर' (sikandar) सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.  भाईजान या सिनेमातून पुन्हा एकदा बॉलिवूड गाजवायला सज्ज आहे. 'सिकंदर' सिनेमाच्या रिलीजपूर्वी सिनेमाची गाणी, टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय. पण सर्वांना एकच प्रश्न पडला होता की 'सिकंदर' सिनेमा नेमका रिलीज कधी होणार? अखेर या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय. कारण 'सिकंदर'च्या रिलीज डेटचा खुलासा झालाय.'सिकंदर' या तारखेला होणार रिलीजकुठलाही नवीन सिनेमा शुक्रवारी रिलीज होतो हे आपल्या सर्वांना माहितच आहे. अनेकदा सणासुदीच्या निमित्ताने काही सिनेमे बुधवारीही रिलीज होतात. पण सलमानच्या 'सिकंदर' निमित्ताने एक गोष्ट बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच घडणार आहे. ती म्हणजे 'सिकंदर' शुक्रवारी किंवा बुधवारी नव्हे तर थेट रविवारी रिलीज होणार आहे. म्हणजेच 'सिकंदर' सिनेमा ईदनिमित्ताने ३० मार्चला संपूर्ण जगभरात रिलीज होणार आहे. बॉलिवूड हंगामाने या बातमीला दुजोरा दिला आहे.'सिकंदर' सिनेमाविषयीसलमान खान, रश्मिका मंदाना या जोडीच्या 'सिकंदर' सिनेमाची उत्कंठा शिगेला आहे. या सिनेमात अभिनेता शर्मन जोशी भाईजानसोबत झळकणार आहे. मुंबईतील खास भागांमध्ये रिअल लोकेशन्सवर 'सिकंदर' सिनेमाचं शूटिंग झालंय. 'हॉलिडे', 'गजनी' यांसारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगोदास यांनी 'सिकंदर'चं दिग्दर्शन केलंय. 'बाहुबली' फेम अभिनेते सत्यराज सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदानाबॉलिवूडशरमन जोशी