सलमान खान आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'सिकंदर' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या ईदला भाईजानचा हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे. १८० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने रिलीजआधीच तब्बल १६५ कोटींची कमाई केली आहे. अजून 'सिकंदर' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झालेली नाही. मग, भाईजानच्या सिनेमाने कोटी रुपये कसे कमावले? जाणून घेऊया.
काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या 'सिकंदर' सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर पाहून चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे. पण, अद्याप 'सिकंदर'चा ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही. असं असलं तरी सिनेमाने मात्र कोट्यवधींची कमाई केली आहे. सलमानच्या 'सिकंदर'ने ही कमाई सिनेमाच्या राईट्समधून केली आहे. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, साजिद नाडियावालांची निर्मिती असलेल्या या सिनेमाने ओटीटी, म्युजिकल आणि सॅटेलाइट राइट्सच्या डीलमधून १६५ रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे रिलीजआधीच सिनेमाचं ८० टक्के बजेट वसूल झालं आहे.
'सिकंदर' सिनेमाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. नेटफ्लिक्सने ८५ कोटींना ही डील केली आहे. पण, सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३५० कोटींची कमाई केली तर ही डील १०० कोटींपर्यंत जाऊ शकते. तर झी सिनेमाने सॅटेलाइट राइट्स ५० कोटींना विकत घेतले आहेत. आणि झी म्युझिक कंपनींकडून 'सिकंदर'च्या गाण्यांची ३० कोटींना डील झाली आहे.
'सिकंदर'मध्ये सलमान खान आणि रश्मिका मंदानासोबत काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर, शरमन जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमातील गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. येत्या ईदला म्हणजेच ३० मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.