Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानने शेअर केला 'ब्लॅक अँड व्हाईट' व्हिडीओ, भाईजानचा असा अंदाज आजवर कधी पाहिला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 10:42 IST

सलमान खानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, त्यात भाईजानचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज दिसून येतोय. 

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) त्याच्या 'दबंग' स्टाईल आणि अभिनयासाठी ओळखला जातोच, पण सध्या त्याच्या एका वेगळ्या टॅलेंटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, त्यात भाईजानचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज दिसून येतोय. 

काय आहे या व्हिडिओमध्ये?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सलमान ब्लॅक अँड व्हाईट अंदाजात दिसतोय. डोक्यावर हॅट आणि काळ्या टी-शर्टमध्ये सलमानचा कूल स्वॅग बघायला मिळतोय. याशिवाय सलमान स्वतःच्या धुंदीत मग्न होऊन एक गाणं गुणगुणताना दिसतोय. सलमानच्या दातात एक झाडाची छोटी काडी दिसतेय. सलमानचा हा अनोखा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. सलमानने आजवर कधीही असा व्हिडीओ शेअर केला नव्हता. त्यामुळे भाईजानने हा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, त्याच्या आगामी मातृभूमी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात सलमानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंग झळकणार आहे. याशिवाय या सिनेमानंतर सलमान लवकरच एका क्लासिक रोमँटिक सिनेमात पाहायला मिळणार आहे. याशिवाय अलीकडेच सलमान 'बिग बॉस १९'चं सूत्रसंचालन करताना दिसला. आता सलमानचा 'मातृभूमी' सिनेमा हिट होता की फ्लॉप याकडे सर्वांचं लक्ष आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan's Rare Black and White Video Captivates Fans Online

Web Summary : Salman Khan's black and white video showcasing a unique, never-before-seen avatar has gone viral. Donning a hat and t-shirt, Salman is seen enjoying himself, leaving fans impressed. He is also anticipating his upcoming 'Matrubhoomi' film with Chitrangada Singh and a romantic movie.
टॅग्स :सलमान खानबॉलिवूड