Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tiger vs Pathaan: सलमान-शाहरुख खानच्या सिनेमाचं काम थांबलं? समोर आलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:12 IST

Tiger vs Pathaan: स्पाय युनिव्हर्समधला सर्वात मोठा सिनेमा, नक्की काय झालं?

बॉलिवूडमधील दोन दिग्गज सुपरस्टार्स शाहरुख खान आणि सलमान खान 'टायगर व्हर्सेस पठाण' सिनेमात एकत्र दिसणार होते. याआधी दोघांनी एकमेकांच्या सिनेमांमध्ये कॅमिओ केलेले आहेत. मात्र वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्समध्ये बनणाऱ्या 'टायगर व्हर्सेस पठाण'मध्ये ते एकत्र मोठ्या पडद्यावर येणार होते. आता हा सिनेमा बंद पडल्याची चर्चा आहे. याचं कारण दोघांचं तगडं मानधन असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता सिनेमाला कुलूप लागल्याची चर्चा आहे.

डेक्कन क्रॉनिकल रिपोर्टनुसार, यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये 'टायगर व्हर्सेस पठाण' हा सर्वात मोठा सिनेमा बनणार होता. मात्र वायआरएफने सिनेमाचं प्रोडक्शन थांबवलं आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सिनेमाचा बजेट असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन दिग्गज सुपरस्टार्सचं मानधन सिनेमा थांबण्याचं कारण बनलं आहे. त्यातच स्पाय युनिव्हर्सचे मागील दोन सिनेमे 'वॉर २' आणि 'टायगर ३' बॉक्सऑफिसर चांगलेच आपटले. त्यामुळे 'टायगर व्हर्सेस पठाण'चं आव्हान आताच मेकर्सला पेलवणारं नाही.

रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, जर दोन्ही खान आपल्या मानधनात काही कमी करणार असतील तर यशराज फ्लॉप सिनेमांनंतरही 'टायगर व्हर्सेस पठाण'चं काम सुरु ठेवू शकतात. मात्र सिनेमाचं बजेट वाढतच चाललं आहे. 

वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्सची सुरुवात २०१२ साली सलमान खानच्या 'एक था टायगर'मधून झाली होती. २०२३ मध्ये सलमानने शाहरुखच्या 'पठाण'मध्ये कॅमिओ केला. त्यानंतर सलमान शाहरुखला अख्ख्या सिनेमात एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले.  यामुळे टायगर आणि पठाणचं क्रॉसओवर दाखवण्याची कल्पना मेकर्सच्या मनात आली. आदित्य चोप्रा टायगर व्हर्सेस पठाणला मोठ्या स्केलवर बनवण्यासाठी उत्सुक होते. मात्र ग्रँड सिनेस्कोप आणि अॅक्शन सीक्वेन्सचा वाढता खर्च पाहता सिनेमाचं बजेट वाढत गेलं.  दरम्यान प्रोजेक्ट तात्पुरता होल्ड वर ठेवण्यात आला आहे. यशराजने अद्याप याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.  

English
हिंदी सारांश
Web Title : Tiger vs Pathaan movie stalled? High fees cited as reason.

Web Summary : The 'Tiger vs Pathaan' film, starring Shah Rukh and Salman Khan, is reportedly stalled due to budget concerns. High actor fees and the underperformance of recent spy universe movies are factors. The project is on hold pending potential budget revisions.
टॅग्स :सलमान खानशाहरुख खानबॉलिवूड