Join us

अखेर गुपित उलगडलं! सलमानसोबतच्या 'त्या' मुलीचा चेहरा दिसला; काय आहे कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:42 IST

सलमानने आता या फोटोमधील मुलीबाबत गुपित उघडं केलं आहे. फोटोतील ती मुलगी कोण? याचं उत्तर भाईजानने चाहत्यांना नव्या पोस्टमधून दिलं आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एका मुलीबरोबरचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सलमानने त्या मुलीबरोबर रोमँटिक पोझ दिली होती. पण या फोटोत मुलीचा चेहरा मात्र दिसत नव्हता. त्यामुळे फोटोत सलमानबरोबर पाठमोरी उभी असलेली ती व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी भाईजानने लग्न केलं का? असंही विचारलं होतं. सलमानने शेअर केलेल्या फोटोतील मुलीने घातलेल्या जॅकेटवर २७/१२ असं लिहिलं होतं. त्यामुळे चाहते आणखीनच संभ्रमात पडले होते. 

सलमानने आता या फोटोमधील मुलीबाबत गुपित उघडं केलं आहे. फोटोतील ती मुलगी कोण? याचं उत्तर भाईजानने चाहत्यांना नव्या पोस्टमधून दिलं आहे. सलमानने त्या मुलीबरोबरचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोत मात्र मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. सलमानने त्या मुलीबरोबर फोटोसाठी पोझही दिल्या आहेत. सलमानबरोबर या फोटोत दिसणारी ती मुलगी म्हणजे अभिनेत्री अलिजेह अग्निहोत्री आहे. 

सलमानच्या बिंग ह्युमन क्लोथिंग या ब्रँडसाठी त्यांनी हे खास फोटोशूट केलं आहे. या फोटोला त्याने "जिन्समध्ये आहे प्रेम आणि काळजी..." असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे ब्रँडच्या जाहिरातीसाठी भाईजानने ही पोस्ट केल्याचं उघड झालं आहे. 

अलिजेह अग्निहोत्री ही सलमानची भाची आहे. तिची आई अलविरा अग्निहोत्री एक निर्माती आहे. तर वडील अतुल अग्निहोत्री अभिनेता आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमानने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत अलिजेह त्याची भाची असल्याचं सांगितलं होतं. 'फॅरी' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. २४ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटी