Join us
Daily Top 2Weekly Top 5

तर शाहरुख नाही, सलमान खानचा असता ‘मन्नत’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 11:40 IST

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान जितका खास, तितकाच त्याचा बंगलाही खास. होय, सुमारे २०० कोटी किंमत असलेल्या ‘मन्नत’ नावाच्या अलिशान बंगल्यात शाहरूख राहतो. पण काय तुम्हाला ठाऊक आहे की, एकेकाळी शाहरूखचा हाच अलिशान बंगला सलमान खान खरेदी करणार होता?

ठळक मुद्देकदाचित हा बंगला शाहरूखच्याच नशीबात लिहिलेला असावा. त्यानुसार शाहरूखने हा बंगला खरेदी केला. पाहताक्षणीत शाहरूख या बंगल्याच्या प्रेमात पडला होता.

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान जितका खास, तितकाच त्याचा बंगलाही खास. होय, सुमारे २०० कोटी किंमत असलेल्या ‘मन्नत’ नावाच्या अलिशान बंगल्यात शाहरूख राहतो. पण काय तुम्हाला ठाऊक आहे की, एकेकाळी शाहरूखचा हाच अलिशान बंगला सलमान खान खरेदी करणार होता?होय, फार कमी ठाऊक असेल की, शाहरुख आधी हे घर सलमान खान विकत घेणार होता. पण सलमानने हा बंगला का विकत घेतला नाही. याचे कारण काय तर सलमानचे वडील सलीम खान. सलमानने अलीकडे एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला. त्याने सांगितले की, शाहरूखने ‘मन्नत’ खरेदी करण्यापूर्वी मला हा बंगला खरेदी करण्याची आॅफर मिळाली होती. पण पापाने हा बंगला खरेदी करण्यास नकार दिला. इतका मोठा बंगला घेऊन काय करायचे? असे पापांचे मत पडले. मग काय मी हा बंगला खरेदी करण्याचा विचार सोडून दिला.

तसेही सलमान कधीच पापा सलीम खान यांचा शब्द टाळत नाही. सलीम खान यांनी नकार दिल्यानंतर सलमान शांत झाला. कदाचित हा व्यवहार चुकणे नियतीचाच भाग म्हणता येईल. कदाचित हा बंगला शाहरूखच्याच नशीबात लिहिलेला असावा. त्यानुसार शाहरूखने हा बंगला खरेदी केला. पाहताक्षणीत शाहरूख या बंगल्याच्या प्रेमात पडला होता.

शाहरूखने एका रेडिओ शोमध्ये याबद्दल सांगितले होते. मी दिल्लीत राहिलेला असल्याने मला मोठ्या घरात राहण्याची सवय होती. गौरीसोबत मुंबईत आल्यावर आम्ही एका लहानशा अपार्टमेंटमध्ये राहू लागलो. तुम्ही इतक्या लहान घरात कसे काय राहता, असे माझी सासू आमहाला नेहमी म्हणायची. पुढे मी मन्नत पाहिला आणि पाहताक्षणीच मी या बंगल्याच्या प्रेमात पडलो. दिल्लीसारखे घर, हा विचार माझ्या मनात आला आणि मी हा बंगला खरेदी करण्याचा निर्धार केला, असे शाहरूखने सांगितले होते. 

टॅग्स :शाहरुख खानसलमान खान