Join us

सलमान खानने ‘त्या’ फितूर बॉडीगार्ड्सची केली हकालपट्टी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 17:29 IST

बॉलिवूड जगताशी संबंधित कुठलीही इत्यंभूत माहिती मिळवायची असेल तर त्याकरिता सेलिब्रिटींचा स्टाफ हा खूपच फायदेशीर ठरत असतो; मात्र कधी-कधी ...

बॉलिवूड जगताशी संबंधित कुठलीही इत्यंभूत माहिती मिळवायची असेल तर त्याकरिता सेलिब्रिटींचा स्टाफ हा खूपच फायदेशीर ठरत असतो; मात्र कधी-कधी हा स्टाफ त्यांच्याकरिता मारकही ठरत असतो. कारण अंतर्गत माहिती माध्यमांमध्ये लिक केल्याने सेलिब्रिटींच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता असते. असाच काहीसा प्रकार बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्याबाबतीत घडल्याचे समोर आले आहे. सलमानच्या स्टाफमधीलच काही लोक फितूर झाल्याने, ते आतली बातमी बाहेर लिक करीत असत. विशेष माहिती लिक करणारी मंडळी सलमानचे बॉडीगार्ड्स असल्याने, त्याच्याशी संबंधित इत्यंभूत माहिती बाहेर सांगितली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेव्हा ही बाब त्याच्या लक्षात आली तेव्हा सलमानने त्यांना थेट नोकरीवरूनच काढून टाकले आहे. वास्तविक, सलमान त्याच्या स्टाफवर त्यातही विशेषत: बॉडीगार्ड्सवर नेहमीच प्रेम करीत असतो. शेरा नावाचा बॉडीगार्ड हा तर जणू काही त्याचा फॅमिली मेंबरच आहे; मात्र आता आम्ही तुम्हाला शेराविषयी नाही तर इतर तीन बॉडीगाडर््सविषयी सांगत आहोत. हे तिन्ही बॉडीगाडर््स सलमानबाबतची इत्यंभूत माहिती माध्यमांमध्ये लिक करीत होते. अगोदरच सलमान अन् वाद हे सूत्र असल्याने या बॉडीगार्ड्सकडून मिळत असलेली माहिती त्यात भर घालणारी ठरत होती. सलमानची काही व्यक्तिगत माहिती, त्याचे शेड्यूल शिवाय त्याच्या परिवाराशी संबंधित काही माहिती हे तिघे जण बाहेर लिक करीत होते. त्यामुळे सलमानला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. जेव्हा ही बाब त्याच्या लक्षात आली तेव्हा त्याने तिघांना घरचा रस्ता दाखविला. सध्या सलमान त्याच्या ‘द बॅँग’टूरमध्ये व्यस्त असून, त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाचे प्रमोशनही तो लवकरच सुरू करणार आहे.