सलमान खान आणि कतरीना कैफ स्टारर ‘भारत’ या चित्रपटाच्या ट्रेलरकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना काही क्षणांपूर्वी सलमानने या चित्रपटातील स्वत:चा लूक शेअर केला. सलमान खान या चित्रपटात वेगवेगळ्या सहा अवतारात दिसणार आहे. साहजिकच चाहते उत्सुक आहे. सलमानने शेअर केलेला ताजा लूक पाहून चाहत्यांची ही उत्सुकता शिगेला पोहोचेल हे नक्की.या फोटोत सलमान खान एका आगळ्यावेगळ्या रूपात दिसतोय. पांढरे केस, पांढरी दाढी असे त्याचे हे लूक आहे. ‘जितने सफेद बाल मेरे सर और दाढी में है, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं है,’ असे हा लूक शेअर करताना सलमानने लिहिले आहे.
पांढरे केस, पांढरी दाढी...! पाहा, सलमान खानचा आगळावेगळा ‘भारत’ लूक !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 11:41 IST
सलमान खान आणि कतरीना कैफ स्टारर ‘भारत’ या चित्रपटाच्या ट्रेलरकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना काही क्षणांपूर्वी सलमानने या चित्रपटातील स्वत:चा लूक शेअर केला.
पांढरे केस, पांढरी दाढी...! पाहा, सलमान खानचा आगळावेगळा ‘भारत’ लूक !!
ठळक मुद्दे ईदच्या मुहूर्तावर ‘भारत’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.