Salman Khan Recalls Last Meeting Shomu Mukherjee Kajol's Father : अभिनेत्री काजोल आणि सलमान खान यांच्या ऑन-स्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी नेहमीच पसंत केले आहे. मात्र, काजोल आणि सलमान खान यांच्यात केवळ व्यावसायिक संबंध नव्हते, तर त्यांच्या कुटुंबातही जिव्हाळ्याचे नाते होते. अलीकडेच काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या लोकप्रिय शो 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' मध्ये सलमान खानने काजोलचे वडील, दिवंगत दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांच्याबद्दल एक अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी आठवण सांगितली, जी ऐकून काजोलही भावुक झाली.
सलमान खानने शोमध्ये खुलासा केला की त्याचे आणि शोमू मुखर्जी यांचे नाते खूप जवळचे होते. शोमू मुखर्जी आठवड्यातून दोनदा सलमानच्या घरी यायचे. सलमान म्हणाला, "काजोलचे वडील आणि मी खूप जवळचे होतो. त्यांच्या मृत्यूच्या फक्त दोन दिवस आधी ते नेहमीप्रमाणे लुंगी घालून घरी आले होते. ते खूप आजारी होते".
या भेटीदरम्यान शोमू मुखर्जी यांनी सलमानकडे एक खास मागणी केली. सलमान म्हणाला, "शोमूदा म्हणाले, 'कृपया मला एक ड्रिंक दे मित्रा. मी त्यांना सांगितले, 'शोमूदा नाही' पण, त्यांनी आग्रह धरला आणि म्हणाले, 'मी काही दिवसांत जात आहे. कृपया मला एक ड्रिंक दे. मला काय करावे हे कळत नव्हते. अखेरीस मी त्यांना एक ड्रिंक बनवून दिली आणि दोन दिवसांनी ते मरण पावले".
काजोल झाली भावुकयावेळी काजोल अतिशय भावुक झाली. काजोलचे वडील शोमू मुखर्जी यांचे २००८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. शोमू मुखर्जी हे पद्मश्री पुरस्कार विजेते शशधर मुखर्जी यांचे पुत्र होते, जे फिल्मालय स्टुडिओचे मालक होते.
Web Summary : Salman Khan shared a touching memory of Kajol's father, Shomu Mukherjee, revealing his last request for a drink just two days before his death. Khan recounted their close bond and Mukherjee's persistence despite his illness, leaving Kajol emotional.
Web Summary : सलमान खान ने काजोल के पिता, शोमू मुखर्जी की एक मार्मिक स्मृति साझा की, जिसमें उनकी मृत्यु से ठीक दो दिन पहले एक पेय के लिए उनकी अंतिम इच्छा का खुलासा किया गया। खान ने उनके करीबी बंधन और मुखर्जी की बीमारी के बावजूद उनकी दृढ़ता को याद किया, जिससे काजोल भावुक हो गईं।