Join us

सलमान खानमुळे निर्माण झाली अभिषेक बच्चनच्या आयुष्यात 'ही' नवी अडचण..वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 18:01 IST

अभिषेक बच्चनने एकामागोमाग एक चार चित्रपट साईन केल्याचे कळते आहे. ज्या पैकी एक चित्रपट आहे प्रभू देवाचा लेफ्टी ज्याची ...

अभिषेक बच्चनने एकामागोमाग एक चार चित्रपट साईन केल्याचे कळते आहे. ज्या पैकी एक चित्रपट आहे प्रभू देवाचा लेफ्टी ज्याची शूटिंग जानेवारीपासून सुरु होणार होती. मात्र ती सुरु होण्याआधीच लांबली आहे त्याच कारण आहे सलमान खान. होय तुम्ही बरोबर वाचलात. प्रभू देवा लेफ्टीच्या आधी सलमान खानच्या दबंग3 चे दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे लेफ्टीचे शूटिंग सुरु व्हायला उशीर होणार आहे. ALSO READ : ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचा 'या' शहरात आहे नवा आशियाना मीडियाच्या रिपोर्टनुसार प्रभू देवा सध्या सलमानच्या दबंग सीरिजवर लक्षकेंद्रीत करु इच्छितो. दबंग 3 चे शूटिंग पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे प्रभू देवा तोपर्यंत बिझी असणार आहे. जो पर्यंत दबंग3 चे शूटिंग पूर्ण नाही होत तो पर्यंत तो दुसऱ्या प्रोजेक्टला हात लावणार नाही आहे. प्रभू देवाला लेफ्टीच्या स्क्रिप्टवर अजून काम करायचे आहे. त्याच्या बिझी शेड्यूलमुळे तो जून-जुलैनंतर हे करु शकतो. अभिषेक बच्चनची भूमिका या चित्रपट फारच वेगळी आहे. अभिषेक एका लेफ्टी व्यक्तिच्या भूमिकेत दिसणार आहे. जो एका हाताने काम करतो आणि आपल्या शहराला तो अनेक संकटातून वाचवतो. योगा-योगाने म्हणा पण खऱ्या आयुष्यातही अभिषेक बच्चन लेफ्टीच आहे. या चित्रपटाची कथा फारच वेगळी आहे. मात्र या चित्रपटाला स्क्रिनवर येण्यासाठी किती वेळ लागले हे सांगू शकत नाही. तर दुसरीकडे अभिषेक बच्चन जेपी दत्त यांच्या पलटन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये लवकरच बिझी होणार आहे. याशिवाय अभिषेक संजय लीला भंसाली यांच्या 'गुस्ताखियां' चित्रपटात दिसण्याची ही शक्यता आहे.