Bollywood Cinema: बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मुलांनी एन्ट्री घेणं हे काही नवं नाही. जान्हवी कपूर, शनाया कपूर तसेच आर्यन खान आणि इब्राहिम अली खान अशा अनेक स्टारकिड्सनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.अशाच एका नवोदित अभिनेत्रीबद्दल इंडस्ट्रीत चर्चा सुरु आहे. ही अभिनेत्री म्हणजे अलीजेह अभिनेत्री. विकास बहल यांच्या आगामी सिनेमातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. कोण आहे अलीजेह जाणून घेऊया...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अलीजेह ही बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेत सलमान खानची भाची आहे. अलीजेह सलमानची बहिण अलविरा अग्निहोत्रीची मुलगी आहे. आता अलीजेह अग्निहोत्री मामाच्या पावलावर पाऊल ठेवतं अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेण्यास सज्ज झाली आहे.व्हरायटी इंडियाच्या वृत्तानुसार, या आगामी प्रोजेकमध्ये अलीजेह अभिनेतासिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
दरम्यान, दिग्दर्शक विकास बह हे ‘क्वीन’, ‘सुपर 30’ और ‘शैतान’ यांसारख्या कलाकृतींसाठी ओळखले जातात. विकास बहल यांनी त्यांच्या कामाने लोकांची मने जिंकली आहेत. मिडिया रिपोर्टनुसार,विकास बहल एका प्रेमकथेवर काम करत आहेत. चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेलं नाही हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जातं आहे.
Web Summary : Salman Khan's niece, Alizeh Agnihotri, is set to make her Bollywood debut. She will star alongside Siddhant Chaturvedi in a film directed by Vikas Bahl, known for 'Queen' and 'Super 30'. The film is reportedly a love story based on true events.
Web Summary : सलमान खान की भतीजी, अलीजेह अग्निहोत्री, बॉलीवुड में अपनी शुरुआत करने के लिए तैयार हैं। वह विकास बहल द्वारा निर्देशित फिल्म में सिद्धांत चतुर्वेदी के साथ अभिनय करेंगी, जो 'क्वीन' और 'सुपर 30' के लिए जाने जाते हैं। फिल्म कथित तौर पर सच्ची घटनाओं पर आधारित एक प्रेम कहानी है।