बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आपल्या चित्रपटांइतकाच आपल्या फिटनेसबाबतही नेहमीच चर्चेत असतो. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर सलमानच्या एका नव्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून त्याचे जोरदार कौतुक होत आहे. सलमानने आगामी चित्रपटासाठी सात-आठ किलो वजन कमी केल्याची चर्चा आहे.
नव्या लूकसाठी ७-८ किलो वजन केले कमी
सलमान खान सध्या दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो एका दिव्यांग चाहत्यासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये सलमान आधीपेक्षा खूपच 'स्लिम' आणि फिट दिसत आहे. 'एक्स'वर (ट्विटर) असा दावा केला जात आहे की, नयनतारासोबतच्या या आगामी चित्रपटासाठी सलमानने सुमारे ७ ते ८ किलो वजन कमी केले आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सलमानने साधा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केला आहे. वयाची साठी जवळ आलेली असतानाही सलमानची ही फिटनेस लेव्हल पाहून चाहते थक्क झाले आहेत. हा फोटो नेमका आत्ताचा आहे की जुना, याबाबत अधिकृत पुष्टी माहिती मिळालेली नसली, तरी त्याच्या 'ट्रान्सफॉर्मेशन'ची सर्वत्र चर्चा आहे.
सलमान खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा पहिल्यांदाच वामशी पेडिपल्ली यांच्या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाला सध्या 'SVC63' असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू झाले असून, निर्माते हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित करणार असल्याची चर्चा आहे. एकीकडे सलमानचा 'मातृभूमी' प्रदर्शनासाठी सज्ज असताना, दुसरीकडे नयनतारासोबतच्या या नव्या अॅक्शन थ्रिलरमधील त्याचा लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Web Summary : Salman Khan's new look is creating buzz. He reportedly lost 7-8 kg for his upcoming film with Nayanthara, directed by Vamshi Paidipally (SVC63). The film tentatively releases in 2027. Fans are excited about his fitness and the new action thriller.
Web Summary : सलमान खान के नए लुक ने मचाया तहलका। कथित तौर पर उन्होंने वामशी पेडिपल्ली (SVC63) द्वारा निर्देशित नयनतारा के साथ अपनी आगामी फिल्म के लिए 7-8 किलो वजन कम किया। फिल्म 2027 में रिलीज होगी। प्रशंसक उनकी फिटनेस और नए एक्शन थ्रिलर को लेकर उत्साहित हैं।