'बॉर्डर २'च्या रिलीजपूर्वी अभिनेता वरुण धवनला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्याच्या अभिनयापासून ते त्याच्या हसण्यापर्यंत अनेक गोष्टींची खिल्ली उडवली जात होती. मात्र, २३ जानेवारी रोजी चित्रपट प्रदर्शित झाला आणि वरुणने आपल्या कामाने सर्वांची बोलती बंद केली. पण, या दरम्यान, बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने वरुणला मोठा पाठिंबा दिला होता. नुकतंच वरुण धवननं याबद्दल खुलासा केलाय.
'बॉर्डर २' च्या यशाच्या पत्रकार परिषदेत वरुणने त्याच्या ट्रोलिंगच्या काळातील एक आठवण शेअर केली. वरुण म्हणाला, "जेव्हा माझ्यावर टीका होत होती, तेव्हा सलमान भाईने मला मध्यरात्री २ वाजता फोन केला. तो फोनवर हसत म्हणाला, 'काळजी नको करू, तुझे चांगले दिवस येत आहेत' त्यांच्या त्या शब्दांनी मला कठीण काळात मोठं धाडस दिलं".
चित्रपट प्रदर्शित होऊन ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर सलमानने वरुणला पुन्हा फोन केला. यावेळचा कॉल वरुणसाठी खूप भावनिक होता. वरुणने सांगितले, "मध्यरात्री २ वाजता सलमान भाईचा फोन आला, तेव्हा मी झोपेतून दचकून उठलो. ते मला म्हणाले, 'मला तुझा अभिमान आहे बेटा' सलमान सहजासहजी कोणाचं कौतुक करत नाहीत, पण त्यांनी ज्या प्रेमाने मला पाठिंबा दिला, ते माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे".
ट्रोलिंग थांबलं आणि कौतुक सुरू झालं'बॉर्डर २'च्या रिलीजआधी वरुणच्या विरोधात मुद्दाम 'नेगेटिव्ह पीआर' केला जात असल्याची चर्चा होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताच चित्र पालटले. वरुणच्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले आणि ट्रोलिंग थांबले. दरम्यान, सनी देओल आणि वरुण धवन स्टारर 'बॉर्डर २' ने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४३० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
Web Summary : Amidst trolling before 'Border 2' release, Salman Khan encouraged Varun Dhawan with a late-night call, boosting his confidence. After the film's success, Salman praised Varun, deeply touching him. 'Border 2' achieved blockbuster status.
Web Summary : 'बॉर्डर 2' की रिलीज़ से पहले ट्रोलिंग के बीच, सलमान खान ने आधी रात को वरुण धवन को फोन करके प्रोत्साहित किया, जिससे उनका आत्मविश्वास बढ़ा। फिल्म की सफलता के बाद, सलमान ने वरुण की प्रशंसा की, जिससे वे बहुत प्रभावित हुए। 'बॉर्डर 2' ब्लॉकबस्टर रही।