सलमान खान (Salman Khan) केवळ त्याच्या हिट चित्रपट आणि दबंग शैलीमुळे बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टार्समध्ये गणला जात नाही, तर तो त्याच्या लाइफस्टाइलमुळेही चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असतो. पण आज आम्ही तुम्हाला त्याच्या चित्रपटांबद्दल किंवा लव्ह लाइफबद्दल नाही, तर बॉलिवूडच्या इतक्या मोठ्या सुपरस्टारला नेमकी कशाची भीती वाटते हे सांगणार आहोत.
'पिंकविला'ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सलमान खानने स्वतः आपल्या या भीतीबद्दल खुलासा केला होता. सलमानने आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. वास्तविक, जेव्हा सलमान खानला विचारण्यात आले की त्याला नेमकी कोणत्या गोष्टीची सर्वाधिक भीती वाटते, तेव्हा त्याने आश्चर्यकारक उत्तर दिले.
''मला माझा आदर गमावायचा नाही''या प्रश्नाच्या उत्तरात सलमान खान म्हणाला होता की, "मला सर्वात जास्त 'आदर' गमावण्याची भीती वाटते, मला कोणालाही निराश करण्यासाठी खूप घाबरतो." त्याने सांगितले की, "जे लोक माझ्यावर प्रेम करतात, मग ते कुटुंब असो, मित्र असो किंवा चाहते... मला त्यांच्या नजरेतील आदर गमावायचा नाही. मला फक्त याच गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते. बाकी कशाचीच मला भीती वाटत नाही."
सलमान खानचे आगामी चित्रपटसलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये 'बॅटल ऑफ गलवान', 'किक २', 'दबंग ४', 'टायगर वर्सेस पठाण' आणि 'नो एंट्री २' यांचा समावेश आहे. याशिवाय, तो सूरज बडजात्यांसोबत आणखी एका फॅमिली ड्रामामध्ये काम करू शकतो आणि 'पवन पुत्र भाईजान' नावाच्या चित्रपटातही दिसण्याच्या चर्चा आहेत. सध्या तो टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस १९'चे सूत्रसंचालन देखील करत आहे.