Join us

'रेस 3' मध्ये सैफ अली खानचा पत्ता सलमान खानने केला कट..वाचा सविस्तर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 11:25 IST

काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला सांगितले होते की सलमान खान रेस सीरिजचा नवा चेहरा आहे. सैफ अली खान स्टारर रेसला ...

काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला सांगितले होते की सलमान खान रेस सीरिजचा नवा चेहरा आहे. सैफ अली खान स्टारर रेसला सलमान खानने रिप्लेस केले आहे. नुकत्याच एक इव्हेंट दरम्यान सैफ म्हणाला की रेसमध्ये सलमानशिवाय आणखीन योग्य हिरो कुणी असूच शकत नाही. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या मेकर्सने रेसच्या तिसऱ्या भागात सैफ अली खानला रिप्लेस करत सलमानच्या नावाची घोषणा केली होती. आपला आगामी चित्रपट 'शेफ'च्या ट्रेलर लाँचिंग दरम्यान सैफ म्हणाला की, ''गेल्या वर्षी रेसचे निर्माते रमेश यांनी मला सांगितले होते की, 'रेस3' ते एका नव्या चेहऱ्याला घेऊन तयार करु इच्छितात. सलमान शिवाय आणखीन कोणता चांगला पर्याय या चित्रपटासाठी होऊ शकत नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि सलमानला माझ्या शुभेच्छा.''  मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार निर्माते रमेश तौरानी यांनी याचित्रपटासाठी सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांची नाव कंफर्म केली आहेत. याचित्रपटाचे दिग्दर्शन रोमो डीसोझा करणार आहे. चित्रपटाच्या उर्वरित स्टार कास्टची नावं अजून फायनल करण्यात आलेली नाहीत.  ALSO READ :   LEAK : ​सलमान खान व कॅटरिना कैफचा इंटिमेट फोटो होतोय वेगाने व्हायरल ! बघितला नसेल तर इथे बघा!!2008 मध्ये आलेल्या सैफ अली खान स्टारर रेसचा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला होता. पहिल्या भागात सैफसोबत अक्षय खन्नासुद्धा दिसला होता. पाच वर्षांनंतर याचित्रपटाचा सीक्वल तयार करण्यात आला. यात सैफसोबत जॉन अब्राहम झळकला होता. आता रेसच्या तिसऱ्या भागात सैफची जागा सलमानने घेतली आहे. ख्रिमसमच्या दरम्यान सलमानचा टायगर जिंदा है चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सलमानसह कॅटरिना कैफसुद्धा झळकणार आहे. हा चित्रपट एका था टायगरचा सीक्वल आहे.