Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सलमान खानला मिळाले नामांकन अन् भडकली वैभवी मर्चंट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 14:00 IST

एका नुकत्याच झालेल्या अवार्ड सोहळ्यात कोरिओग्राफर वैभवी मर्चंड हिचा राग अनावर झाला. याचे कारण होते, सलमान खानला मिळालेले नामांकन. ...

एका नुकत्याच झालेल्या अवार्ड सोहळ्यात कोरिओग्राफर वैभवी मर्चंड हिचा राग अनावर झाला. याचे कारण होते, सलमान खानला मिळालेले नामांकन. होय, सलमान खानला ‘बेस्ट कोरिओग्राफर’ या श्रेणीत नॉमिनेशन मिळाले आणि वैभवी जाम भडकली. सलमानला ‘जग घुमेया’ या गाण्यासाठी ‘बेस्ट कोरिओग्राफर’ श्रेणीत नॉमिनेशन दिले गेले. (तीच विचित्र स्टेप, ज्यात सलमान जमिनीवर लेटून आपल्या कपड्यांनी जमीन साफ करताना दिसतो.) या गाण्यातील या कोरिओग्राफीसाठी सलमानला नॉमिनेशन मिळणे म्हणजे अतिच झाले. वैभवीने याबद्दलचाच संताप twitterवर बोलून दाखवला. खरे तर वैभवीला सुद्धा ‘नशे शी चढ गई है...’या ‘बेफिक्रे’मधील गाण्यासाठी ‘बेस्ट कोरिओग्राफर’ श्रेणीत नॉमिनेशन मिळाले होते. पण तरिही वैभवी संतापली. कारण ‘जग घुमेया’ हे गाणे सुद्धा वैभवीने कोरिओग्राफ केले आहे. अर्थात यात सलमानने त्याची एक स्टेप टाकली आणि ‘सुल्तान’च्या प्रमोशनदरम्यान सलमानच्या याच  डान्स स्टेपवर सर्वाधिक फोकस करण्यात आला. यामुळे वैभवी मागे पडली आणि केवळ या एका स्टेपसाठी सलमानला ‘बेस्ट कोरिओग्राफर’च्या श्रेणीत नामांकन मिळाले. वैभवीचा आक्षेप सरळ साधा होता. केवळ एका स्टेपमुळे या संपूर्ण गाण्याच्या कोरिओग्राफीचे संपूर्ण श्रेय सलमान खानला देणे तिच्या मते, योग्य नव्हते. हा संताप तिने टिष्ट्वटरवर व्यक्त केला .‘जग घुमेया’ या गाण्यासाठी माझा अतिप्रिय मित्र सलमान खानला ‘बेस्ट कोरिओग्राफर’त नामांकन मिळू शकते तर मला ‘सुल्तान’साठी ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ श्रेणीत मला नॉमिनेशन का मिळू नये? असा सवाल म्हणूनच तिने twitterवर विचारून टाकला.  वैभवीची ही भूमिका योग्य की अयोग्य, हे आता तुम्हीच ठरवा. आमचे मत विचाराल तर ‘वैभवी के बातों मे दम है, बॉस’!!{{{{twitter_post_id####{{{{twitter_post_id####}}}}}}}}