सलमानने अहीलला गिफ्ट केले ‘लकी ब्रासलेट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 20:05 IST
भाच्याला मामू सलमान अशा प्रकारे बिघडवत आहे
सलमानने अहीलला गिफ्ट केले ‘लकी ब्रासलेट’
सलमान खान आपल्यासाठी अनेक गोष्टी लकी मानतो. त्याच्या ‘लकी थिंग्स’मध्ये त्याच्या हातात असणारे लक ी ब्रासलेटही अनेकदा दिसते. मात्र आता सलमानचे ‘लकी ब्रासलेट’ त्याच्या हातात दिसणार नाही. कारण त्याने आपले ब्रासलेट भाचा अहिलला गिफ्ट केले आहे. सलमानची बहिण अर्पिताने ‘इन्स्टाग्राम’ या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केलेल्या फोटोमधून हा अंदाज लावण्यात येत आहे. यामुळे अभिनेता सलमान खानची ओळख असलेले ब्रेसलेट आता त्याच्या हातात दिसणार नाही. सोशल मीडियावर सलमानची बहिण अर्पिता बरीच सक्रिय असते. नुकतेच तिने पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. अर्पिताने तिच्या मुलाचे म्हणजेच अहिलचे फोटो पोस्ट करत त्याखाली लिहिलेले कॅप्शन वाचून तुम्हालाही आश्चर्यच वाटेल.अर्पिंताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्पिताने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये अहिल मामू सलमान खानच्या लकी ब्रेसलेटसोबत खेळत असल्याचे दिसते. फोटो पाहून अहिल सलमानचे ब्रेसलेट खेळण्यापेक्षा चघळतानाच दिसत आहे. त्यालाही या मामू सलमानच्या ब्रेसलेटची भुरळ पाडली असावी. अर्पिताने अहिलचे ब्रेसलेटसोबत खेळतानाचे काही फोटो पोस्ट करत त्यात स्पष्ट केले आहे, की त्यावेळी ती अहिलच्या आजूबाजूला नव्हती. तिच्या गैरहजेरीतच भाच्याला मामू सलमान अशा प्रकारे बिघडवत आहे असेही अर्पिताने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. ">http:// सलमान खानसाठी त्याचा भाचा अहिल खास आहे असे सांगितले जाते. याचमुळे आपले खास ब्रासलेट त्याने अहिलले दिले असावे असे दिसते. आता मामूजानने आपल्या लाडक्या भाच्याला गिफ्ट दिले यात वावगे काय? यामुळे सलमानच्या चाहत्यांना आनंदच होणार नाही का?