सन २००३ मध्ये प्रदर्शित ‘तेरे नाम’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. सलमान खानच्या करिअरच्या डुबत्या नौकेला तारणारा हाच तो चित्रपट. या चित्रपटानंतर सलमान ‘राधे’ नावाने ओळखला जाऊ लागला होता. या चित्रपटातील सलमानची हेअरस्टाईल इतकी अनोखी होती की, अनेक तरूणांनी या हेअरस्टाईलची कॉपी केली होती. १६ वर्षांनंतर हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटाचा येऊ घातलेला सीक्वल.होय,‘तेरे नाम’चा सीक्वल येतोय. सतीश कौशिक यांनी ‘तेरे नाम’ दिग्दर्शित केला होता. तेच ‘तेरे नाम 2’ दिग्दर्शित करणार आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, सतीश कौशिक यांनी ‘तेरे नाम 2’ची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. तूर्तास सतीश कौशिक पंकज त्रिपाठी स्टारर ‘कागज’ या चित्रपटात बिझी आहेत. हा चित्रपट हातावेगळा करताच ते ‘तेरे नाम 2’चे काम सुरु करणार आहेत. ‘तेरे नाम 2’संदर्भातील बातम्या ख-या आहेत. मी हा चित्रपट बनवतो आहे. सध्या मी यापेक्षा अधिक काहीही सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
१६ वर्षांपूर्वीच्या सुपरडुपर हिट ‘तेरे नाम’चा बनणार सीक्वल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 13:01 IST
सन २००३ मध्ये प्रदर्शित ‘तेरे नाम’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. १६ वर्षांनंतर हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटाचा येऊ घातलेला सीक्वल.
१६ वर्षांपूर्वीच्या सुपरडुपर हिट ‘तेरे नाम’चा बनणार सीक्वल!
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सतीश कौशिक यांनी या सीक्वलसाठी भाईजान सलमान खानशी संपर्क साधला होता. पण सलमानने हा चित्रपट नाकारला. यानंतर कौशिक यांनी दोन नव्या कलाकारांना घेऊन ‘तेरे नाम 2’ बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळतेय.