Join us

Salman Khan: 'प्रेम की शादी'चे शूटिंग लवकरच सुरू होणार, पुन्हा एकत्र येणार सूरज बडजात्या आणि सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 16:34 IST

सलमान खान सध्या चर्चेत आहे. यावेळी चाहत्यांना त्याचा ओटीटीवरील बिग बॉस शो खूप आवडतो. काही काळापूर्वी सलमानचा 'किसी का ...

सलमान खान सध्या चर्चेत आहे. यावेळी चाहत्यांना त्याचा ओटीटीवरील बिग बॉस शो खूप आवडतो. काही काळापूर्वी सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लोकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप झाला. आता पुन्हा एकदा सलमान खानने सूरज बडजात्याशी हातमिळवणी केल्याची बातमी येत आहे. दोघेही एका प्रोजेक्टसाठी एकत्र येत आहेत.

सलमान खान आणि सूरज बडजात्या ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित अभिनेता-दिग्दर्शक जोडी मानली जाते. या दोघांनी आतापर्यंत मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है यांसारखे हिट सिनेमा दिले आहेत. आता पुन्हा एकदा दोघे एकत्र दिसणार आहेत. अमर उजाल्याच्या रिपोर्टनुसार, सलमान खान आता सूरज बडजात्यासोबत प्रेम की शादी या चित्रपटासाठी काम करण्यास तयार आहे.

'प्रेम की शादी' या चित्रपटाचे शुटिंग पुढील महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे. 2020 मध्ये जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट सलमान खानला सांगितली गेली तेव्हा त्याला ती खूप आवडली होती. सत्यप्रेम की कथा या चित्रपटांप्रमाणे एक कौटुंबिक-आधारित रोमँटिक ड्रामा चित्रपट असेल. असे म्हटले जात आहे की सलमानला अशा कथा आवडतात, त्यामुळेच त्याने लगेच होकार दिला. आता पुढच्या महिन्यात त्याचे शूटिंग सुरू होणार आहे.

वर्क फ्रंटवर, सलमान खान किसी का भाई किसी की जानमध्ये दिसला होता. लवकरच तो 'टायगर 3'मध्ये दिसणार आहे. त्याचे शूटिंग सुरू आहे. त्याचबरोबर पठाण वर्सेस टायगरमध्येही सलमान खान दिसणार आहे. यात शाहरुख खानही त्याच्यासोबत असणार आहे. 

टॅग्स :सलमान खान