Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या जागी कुणीही येईल! प्रियांका चोप्राच्या ‘भारत’ सोडण्यावर बोलले सलीम खान !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 13:31 IST

 होय, सलमान खानचे वडिल सलीम खान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.प्रियांकाने ऐनवेळी ‘भारत’ सोडला, याबद्दल त्यांना विचारले गेले.

प्रियांका चोप्राने ‘भारत’मध्ये काम करण्यास नकार दिला. अमेरिकन बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत लग्न करण्याची योजना असल्याने प्रियांकाने ‘भारत’ सोडला, असे सांगितले गेले. पण यानंतर लगेच प्रियांकाने सलमान खानमुळे ‘भारत’ सोडल्याची चर्चा रंगली. ‘भारत’मध्ये एकापाठोपाठ एक अशा अनेक हिरोईनची एन्ट्री बघून प्रियांका म्हणे काहीसी असुरक्षित झाली. आपलीही स्थिती ‘रेस3’मधील जॅकलिन फर्नांडिससारखी तर होणार नाही ना, या भीतीने म्हणे तिने ‘भारत’ सोडणेचं योग्य समजले.

आता या संपूर्ण प्रकरणात सलमान खानचे वडिल सलीम खान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. होय, प्रियांकाने ऐनवेळी ‘भारत’ सोडला, याबद्दल त्यांना विचारले गेले. यावर ‘हे काही पहिल्यांदा झालेले नाही. अशा गोष्टी इंडस्ट्रीत होतचं असतात. माझ्या जंजीर चित्रपटाच्यावेळी देखील असेच आत-बाहेर झाले होते. कधी डेट जुळत नाही. कधी भूमिका वा कधी पैसा आडवा येतो. कधीकधी माणसाच्या काही व्यक्तिगत अडचणी असतात. पण आम्ही लवकरचं यात अन्य कुणाला कास्ट करू. आम्ही प्रियांकावर नाराज नाही. सलमानही तिच्यावर नाराज नाही,’ असे सलीम खान म्हणाले. प्रियांकाच्या जागी अन्य कुणाला कास्ट करणार, असे विचारले असता, ‘कुणीही येईल, तिच्याजागी..ख़ूप सारे लोक आहेत,’ असे ते म्हणाले.

 

टॅग्स :प्रियंका चोप्रा