Join us

भाईजान सलमान खान ‘राधे’त बिझी, मग सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय #Tiger3?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 16:09 IST

सध्या भाईजान ‘राधे’ या सिनेमात बिझी आहे. पण सोशल मीडियावर मात्र ‘राधे’ नाही तर ‘टायगर 3’ ट्रेंड करतोय.

ठळक मुद्दे ‘टायगर 3’ आलाच तर त्यात नवे काय बघायला मिळेल, ते जाणून घेणेही इंटरेस्टिंग असणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखला जातो. भाईजानचा एक स्वत:चा चाहता वर्ग आहे. साहजिकच भाईजानचा सिनेमा आला रे आला की चाहत्यांच्या उड्या पडतात. सध्या भाईजान ‘राधे’ या सिनेमात बिझी आहे. पण सोशल मीडियावर मात्र ‘राधे’ नाही तर ‘टायगर 3’ ट्रेंड करतोय.होय, ‘एक था टायगर’ फ्रेन्चाइजीचा तिसरा पार्ट येणार असल्याची तूर्तास जोरदार चर्चा आहे. 2012 मध्ये या फ्रेन्चाइजीचा पहिला सिनेमा आला. त्याचे नाव होते, ‘एक था टायगर’. सलमान व कतरीना कैफचा हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. 2017 मध्ये याचाच दुसरा भाग अर्थात ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा रिलीज झाला आणि बघता बघता ब्लॉकबस्टर ठरला. आता या फ्रेन्चाइजीचा तिसरा भाग येणार, अशी कुजबुज सुरु झाली आहे. अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण का कुणास ठाऊक सोशल मीडियावर मात्र #Tiger3 ट्रेंड होतोय.

2022 मध्ये या चित्रपटाच्या रूपात सलमान भाईकडून मोठी ईदी मिळेल, अशी आशा चाहते बाळगून आहेत.  

आम्हाला ‘किक 2’नंतर लगेच ‘टायगर 3’ पाहायचा आहे, अशा शब्दांत चाहत्यांनी आपली उत्सुकता बोलून दाखवली आहे. #Tiger3 या हॅशटॅगसह अशा अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. टायगर इज बॅक, असेही चाहत्यांनी लिहिले आहे.

‘टायगर’ फ्रेन्चाइजीचा सिनेमा केवळ बॉलिवूडसाठीच नाही तर सलमानसाठीही मोठा सिनेमा आहे. आता फक्त याची घोषणा कधी होते, तेच बघायचेय. ‘टायगर 3’ आलाच तर त्यात नवे काय बघायला मिळेल, ते जाणून घेणेही इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :सलमान खान