सलमान खान इन्स्टाग्रामवर कॅटरिना कैफला नव्हे तिच्या बहिणीला करतोय फॉलो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 18:20 IST
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे नाव त्या कलाकारांमध्ये घेतले जाते, जे सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव असतात. सलमानच्या फॅन फॉलोइंगचा अंदाज ...
सलमान खान इन्स्टाग्रामवर कॅटरिना कैफला नव्हे तिच्या बहिणीला करतोय फॉलो!
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे नाव त्या कलाकारांमध्ये घेतले जाते, जे सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव असतात. सलमानच्या फॅन फॉलोइंगचा अंदाज लावणे मुश्कील आहे. मात्र सलमान खान इन्स्टाग्रामवर अशा दोन लोकांना फॉलो करतो, ज्यांचे नाव वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सलमान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांच्यातील मैत्रीची चर्चा बी-टाउनमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असते. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात असलेले हे दोघे आज जरी विभक्त असले तरी, त्यांच्यातील मैत्री कायम आहे. सलमान अजूनही कॅटला त्याची चांगली मैत्रीण समजतो. मात्र अशातही तो इन्स्टावर कॅटला नव्हे तर तिच्या बहिणीला फॉलो करीत आहे. धक्का बसला ना? होय, सलमान चक्क कॅटच्या बहिणीला फॉलो करीत असून, या यादीत आणखी एका मुलाच्या नावाचा समावेश आहे. सलमान आणि कॅटमध्ये खूप चांगली बॉन्डिंग आहे. कॅट नेहमीच सलमानच्या फॅमिली फंक्शनमध्ये हजेरी लावताना बघावयास मिळाली आहे. ब्रेकअपनंतरही दोघे ‘टायगर जिंदा है’ या सुपरहिट चित्रपटात काम करताना बघावयास मिळाले होते. कॅटरिना कैफ सलमानच्या वॅरिफाइड इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करते. परंतु सलमान कॅटला फॉलो करीत नाही. सलमान फॉलो करीत असलेल्यांची यादी केवळ दोनच यूजर्सची आहे. ज्यामध्ये एक तेरा वर्षांचा मुलगा आहे, जो कुकीज विकून मिळालेले पैसे चॅरिटी करतो. तर दुसरे नाव कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ हिचे आहे. दरम्यान, जेव्हा कॅटरिना कैफने इन्स्टाग्रामवर डेब्यू केला होता, तेव्हा सलमान खानने कॅटचे स्वागत करताना लिहिले होते की, ‘इन्स्टावर स्वागत आहे.’ यावेळी सलमानने कॅटला टॅगही केले होते. स्पॉटबॉयच्या एका रिपोर्टनुसार, इसाबेला कैफ सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याच्या आगामी ‘लवरात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. इसाबेलाने लूक टेस्ट पास केली आहे. परंतु आॅडिशनमध्ये तिला म्हणावा तस परफॉर्मन्स देता आला नाही. त्याचबरोबर हिंदी बोलण्यातही तिला अडचण येत आहे. यामुळे इसाबेलाला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.