Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खान आणि दिशा पटानीच्या 'सिटी मार' गाण्याने 24 तासांत तोडले सगळे रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 18:28 IST

रिलीजनंतर काही वेळातच हे गाणं ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले.

‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’मधील सलमान खान-दिशा पटानीचे 'सिटी मार' 26 एप्रिलला रिलीज झाले. रिलीजनंतर 24 तासांत सिटी मार गाण्याने सगळे रेकॉर्ड तोडून टाकले. रिलीजनंतर 30 मिलियन व्ह्यूज आले. रिलीजनंतर काही वेळातच हे गाणं ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले. या शिवाय, 'सिटी मार' यूट्यूबवर सर्वात वेगाने 2 लाख लाईक्स मिळवणारे बॉलीवुड गाणे पहिले गाणे आहे. हा डांस नंबर यूट्यूबवर सध्या टॉपवर आहे.

'सिटी मार' या गाण्याला कमाल खान आणि लुलिया वंतूर गायले असून शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला असून  शेख जानी बाशा ज्यांना जानी मास्टर नावाने ओळखले जाते त्यांनी याची कोरियोग्राफी केली आहे.   सिग्नेचर डांस स्टाइलसोबत, तरुणाईची सध्याची आवडती हॉट आणि सुंदर अभिनेत्री दिशा पटानीसोबतची त्याची जोडी, शेख जानी बाशा ज्यांना जानी मास्टर नावाने ओळखले जाते त्यांची कोरियोग्राफी आणि प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार, ‘सिटी मार’मध्ये प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावत आहे. जानी मास्टर आणि प्रभुदेवाने हिप-हॉपसोबत क्लासिक साउथ स्टाइल कोरियोग्राफीचे उत्तम मिश्रण सादर केले आहे.

सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सलमान खानदिशा पाटनी