सलमान करणार मराठीत डेब्यू ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 18:38 IST
निर्माता-अभिनेता रितेश देशमुख याने नुकतेच घोषित केले की, तो मराठीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित एक चित्रपट काढणार ...
सलमान करणार मराठीत डेब्यू ?
निर्माता-अभिनेता रितेश देशमुख याने नुकतेच घोषित केले की, तो मराठीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित एक चित्रपट काढणार आहे. आणखी एक विशेष म्हणजे या चित्रपटातून सल्लूमियाँ मराठीत डेब्यू करणार आहे. वेल, आता ‘सुल्तान’ चे यश पाहता भाईने सक्सेस पार्टी आयोजित केली होती.यावेळी सलमानने स्वत:च सांगितले की,‘मी रितेश देशमुख सोबत एक मराठी चित्रपट करतोय. छत्रपती शिवरायांवर चित्रपट आधारित आहे. मी पाच ते सहा दिवस चित्रपटाचे शूटींग करणार आहे.हा सलमानचा पहिला प्रादेशिक चित्रपट आहे. यानंतर तुम्हाला वाटत असेल की, सलमानची भूमिका नेमकी काय असणार आहे? वेल, हा तर खरं आकर्षणाचा भाग आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव हे असतील.