Join us

सलमान खानने पूर्ण केली ‘जुडवा-२’ची शूटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 21:08 IST

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या सुपरहिट ‘जुडवा’ या चित्रपटाचा सीक्वल येत असून, यामध्ये सलमान कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे. ...

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या सुपरहिट ‘जुडवा’ या चित्रपटाचा सीक्वल येत असून, यामध्ये सलमान कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे. ‘जुडवा-२’मध्ये सलमानची जागा वरुण धवन घेणार आहे. तर जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. दरम्यान, सलमानने चित्रपटातील त्याची भूमिका पूर्ण केली असून, याबाबतचा एक फोटो वरुण धवनने शेअर केला आहे. फोटोमध्ये ‘जुडवा-२’ची संपूर्ण टीम बघावयास मिळत आहे. ‘जुडवा-२’मध्ये सलमान कॅमिओ करणार असल्याचे बºयाच दिवसांपासून बोलले जात होते. परंतु याविषयी कोणीही निश्चितपणे सांगू शकत नव्हते. अखेर वरुणने ‘जुडवा-२’च्या टीमसोबत फोटो शेअर करून ‘कॅमिओ’च्या वृत्ताला एकप्रकारचा दुजोराच दिला आहे. दरम्यान, या फोटोवरून एक गोेष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे सलमानने त्याची शूटिंग पूर्ण केली आहे. परंतु हे निश्चितपणे सांगणे थोडे घाईचे ठरेल. असो, सध्या कॅमिओचा जमाना असून, सलमानच्या ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटात किंग शाहरूख खानने कॅमिओ केला होता. त्याचबरोबर सलमान शाहरूखच्याही एका चित्रपटात कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे. दरम्यान, वरुणने शेअर केलेल्या फोटोला हे  #Judwaa2 just got bigger। The man @BeingSalmanKhan is in it now। कॅप्शन दिले आहे. वरुण या चित्रपटाविषयी खूपच आनंदी असून, त्याने यासाठी सलमानकडून खास टिप्स घेतल्याचे समजते. जेव्हा त्याला संधी मिळत असे तेव्हा तो सलमानकडे टिप्स घेण्यासाठी जात होता. सलमानलादेखील वरुणचा हा स्वभाव खूपच आवडला असून, सलमानने त्याच्या बºयाचशा जुन्या जीन्स वरुणला दिल्या आहेत. जेणेकरून त्याचा लुक सलमानच्या लुकशी काहीसा साम्य साधणारा असावा. असो, हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.