Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानने बॉलिवूडची परंपरा मोडली! 'बॅटल ऑफ गलवान'च्या सेटवर करतोय 'ही' खास गोष्ट, चाहत्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:27 IST

सलमान खानने त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंग सेटवर ही खास गोष्ट केली आहे. त्यामुळे सर्वांनी सलमानचं कौतुक केलं आहे

बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान (Salman Khan) लवकरच 'बॅटल ऑफ गलवान' या महत्त्वाकांक्षी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने एक मोठा आणि अत्यंत सकारात्मक बदल घडवून आणला आहे. त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक वर्षांपासून चालत आलेली एक प्रथा पूर्णपणे मोडीत काढली आहे. त्यामुळे चाहत्यांनी सलमानचं कौतुक केलं आहे. 

मिड-डेच्या रिपोर्टनुसार, चित्रपटसृष्टीच्या सेटवर कलाकार आणि क्रू मेंबर्ससाठी सहसा तीन वेगवेगळ्या दर्जाचे जेवण दिलं जायचे. पहिल्या श्रेणीत मुख्य कलाकार आणि निर्माते, दुसऱ्या श्रेणीत तंत्रज्ञ आणि विविध विभाग प्रमुखांसाठी आणि तिसऱ्या श्रेणीत स्पॉट बॉय, कामगार आणि इतर सदस्यांचा समावेश होतो. या तिन्ही श्रेणींसाठी जेवणाचा वेगवेगळा दर्जा असायचा. पण 'बॅटल ऑफ गलवान'साठी सलमानने ही पद्धत मोडीत काढून सर्वांसाठी समान जेवण ठेवलं आहे.  

जेवणातील फरक मिटवण्यासाठी सलमान खानने त्याच्या 'बीईंग हंग्री' (Being Haangry) या मोबाईल किचनची व्यवस्था  'बॅटल ऑफ गलवान'च्या सेटवर केली आहे. या नवीन व्यवस्थेअंतर्गत, आता 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला, मग तो स्पॉट बॉय असो, कॅमेरामन असो किंवा खुद्द सलमान खान असो,  एकाच प्रकारचे आणि समान दर्जाचे जेवण पुरवले जात आहे.

सलमान खानने 'सिकंदर' चित्रपटाच्या सेटवर ही व्यवस्था सुरू केली होती, जी आता 'बॅटल ऑफ गलवान'च्या शूटिंगदरम्यानही सुरू ठेवली आहे. 'बिग बॉस'च्या सेटवरही या मोबाईल किचनचा वापर केला जातो.

'Being Haangry'ची कहाणी

'बीईंग हंग्री'ची सुरुवात कोविड-१९ महामारीच्या काळात फूड ट्रक म्हणून झाली होती. ज्याद्वारे देशभरातील कामगारांना जेवण पुरवले जात होते. पाच वर्षांनंतर, या ट्रक्सचे रूपांतर आता मोबाईल ट्रकमध्ये करण्यात आले आहे.

यासाठी दोन व्हॅन तयार करण्यात आल्या आहेत. या व्हॅनमध्ये स्वयंपाकघराव्यतिरिक्त कोल्ड स्टोरेजचीही सुविधा आहे. एका शिफ्टमध्ये दोन कुक काम करतात आणि एका वेळी ५०० लोकांसाठी जेवण तयार करण्याची क्षमता या मोबाईल किचनमध्ये आहे. सलमानच्या या निर्णयामुळे इंडस्ट्रीमध्ये एक सकारात्मक बदल घडून आणला गेला आहे, जिथे सर्व क्रू मेंबर्सना समान आणि उत्तम दर्जाचे जेवण मिळत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan breaks Bollywood tradition, ensures equal treatment on set.

Web Summary : Salman Khan ended meal disparities on 'Battle of Galwan' set. All crew members receive equal, quality food from his 'Being Haangry' mobile kitchen, a practice started on 'Sikandar'.
टॅग्स :सलमान खानबॉलिवूडअन्न