बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. अलिकडेच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता भाईजानच्या सिनेमातील एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुहुर्त साधत 'बॅटल ऑफ गलवान'मधील मातृभूमी हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात भाईजानचा फौजी अवतार पाहायला मिळत आहे.
'बॅटल ऑफ गलवान'मधील मातृभूमी या गाण्यात सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांची जोडी प्रेक्षकांना आवडली आहे. हे भावनिक गाणं काही तासांतच व्हायरल झालं असून या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मातृभूमी गाण्यात युद्धभूमीवरचे काही सीन्स दिसत आहेत. त्यासोबतच फौजीचे कुटुंबीयांसोबतचे काही खास क्षणही दाखवण्यात आले आहेत. अरजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर हिमेश रेशमियाचं संगीत आहे.
अपुर्व लखिया दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात सलमान खान भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, त्याचा हा अवतार आजवरच्या सर्वात प्रभावी आणि दमदार भूमिकांपैकी एक मानला जात आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट सलमा खान यांच्या ‘सलमान खान फिल्म्स’ या बॅनरखाली निर्मित होत आहे. हा सिनेमा १७ एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Summary : Salman Khan's 'Battle of Galwan' song 'Matrubhoomi' is out, showcasing his army avatar alongside Chitrangada Singh. The song, sung by Arijit Singh and Shreya Ghoshal with music by Himesh Reshammiya, features war scenes and family moments. The film releases April 17, 2026.
Web Summary : सलमान खान की फिल्म 'बैटल ऑफ गलवान' का गाना 'मातृभूमि' रिलीज हो गया है, जिसमें चित्रांगदा सिंह के साथ उनका फौजी अवतार दिखाया गया है। अरिजीत सिंह और श्रेया घोषाल ने इसे गाया है और हिमेश रेशमिया ने संगीत दिया है। फिल्म 17 अप्रैल, 2026 को रिलीज होगी।