Join us

सलमान खानने जाहिर केली आयुष शर्माच्या 'लवरात्रीची' रिलीज डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 14:19 IST

सलमान खानने आयुष शर्माचा चित्रपट लवरात्रीच्या अभिनेत्रीची घोषणा ट्विटरवरुन केली होती. तेव्हा सगळ्यांच आश्चर्याचा धक्का बसला होता. सलमानने त्यावेळेस आपल्या ...

सलमान खानने आयुष शर्माचा चित्रपट लवरात्रीच्या अभिनेत्रीची घोषणा ट्विटरवरुन केली होती. तेव्हा सगळ्यांच आश्चर्याचा धक्का बसला होता. सलमानने त्यावेळेस आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले होते की 'मला मुलगी मिळाली आहे' त्यावरून सगळ्यांना सलमान स्वतःच्या लग्नासाठी मुलगी शोधली आहे असे वाटले होते. पण थोड्याच वेळात त्यांने या स्पेंन्सस वरुन पडदा उचलला. आयुषच्या पहिला चित्रपट 'लवरात्री'साठी मला मुलगी मिळाली आहे. आज पण सलमानने असेच काहीतरी केले आहे. यावेळेस त्याने मुलगी भेटण्याची गोष्ट न करता त्याने आयुष शर्माचा चित्रपट लवरात्री ची रिलीज डेट जाहीर केली आहे. सलमान खान ने आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहले आहे की "लवरात्री आजपासून २२४ दिवसांनी रिलीज होणार सांगा तारीख काय असेल?" आता तुम्ही म्हणाल की जेव्हा सलमान खानने लवरात्रीचे पोस्टर रिलीज केले होते तेव्हा त्या पोस्टरवर तारीख लिहिली होती मग त्यावर अचानक वेगळे ट्विट करायची गरज काय ? पण या ट्विट वरून असा अंदाज लावण्यात येतो की त्यांनी चित्रपटाची रिलीज डेट बदलली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर रिलीज डेट २१सप्टेंबर लिहिण्यात आली होती. मात्र सलमानने केलेल्या शुक्रवारच्या ट्विटनुसार ५ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होईल. आयुष शर्माच्या ह्या पहिल्या चित्रपटात वारीना हुसेन झळकणार आहे. वरीनाचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे ह्याआधी वरीना म्युझिक व्हिडिओ आणि टीव्हीच्या जाहिरातीत काम करत होती. आयुष व वरीना या दोघांचा ‘लवरात्री’ हा सिनेमा एक लव्हस्टोरी आहे. गुजरातच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या चित्रपटात वरीना एका बेले डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिराज मीनावाला हे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवताहेत.