सलमान खान आणि शाहरूख खान बनले स्क्रिप्ट रायटर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 13:01 IST
अलीकडेच पार पडलेल्या ‘२३ व्या स्टार स्क्रिन अॅवॉर्ड्स २०१६’ चे यजमानपद त्यांनी भूषवले आहे. एवढेच नाही तर या सोहळ्याच्या होस्टिंगसाठी लागणारी स्क्रिप्ट त्यांनी स्वत:च लिहिली असल्याचे सुत्रांकडून कळतेय.
सलमान खान आणि शाहरूख खान बनले स्क्रिप्ट रायटर?
शीर्षक वाचून विचारात पडलात का? ‘बी टाऊन’चा सुपरस्टार सलमान खान आणि बादशाह शाहरूख खान यांनी आता अभिनय सोडून स्क्रिप्ट रायटिंग करणं सुरू केलं की काय? असा जर तुम्ही विचार करत असाल तर तो अगदी चुकीचाय. कारण ते काही नेहमीसाठीच ‘स्क्रिप्ट रायटर’ बनले नाहीत तर केवळ अलीकडेच पार पडलेल्या ‘२३ व्या स्टार स्क्रिन अॅवॉर्ड्स २०१६’ चे यजमानपद त्यांनी भूषवले आहे. एवढेच नाही तर या सोहळ्याच्या होस्टिंगसाठी लागणारी स्क्रिप्ट त्यांनी स्वत:च लिहिली असल्याचे सुत्रांकडून कळतेय. एका वाहिनीच्या सुत्रांनुसार,‘ते दोघे सुपरस्टार असल्याने आम्ही त्यांच्यासाठी स्क्रिप्ट रायटर बोलावले होते. मात्र, त्याच दोघांनी स्क्रिप्ट रायटरला नकार देऊन आम्ही स्वत:च आमची स्क्रिप्ट रायटिंग करणार असल्याचे सांगितले. नेहमीच आमच्यात होत असलेल्या भांडणांना आम्ही यानिमित्ताने पूर्णविराम देणार आहोत. या सोहळयाची थीम ‘सेलिब्रेटिंग फ्रेंडशिप’ असल्याने त्यांनी या स्क्रिप्टला पर्सनल टच देण्याचा प्रयत्न केला. या सोहळ्यासाठी प्रसिद्ध जोडी ‘करण-अर्जुन’ च्या वेशात एन्ट्री घेऊन सोहळ्याचे होस्टिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राकेश रोशन यांच्या १९९५ मधील ‘करण अर्जुन’ चित्रपटात शाहरूख खान आणि सलमान खान हे पहिल्यांदा एकत्र आले होते. त्यानंतर ‘दुश्मन दुनिया का’,‘कुछ कुछ होता हैं’,‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘हम तुम्हारे हैं सनम’ यासारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले. कालांतराने त्यांच्या नात्यांतील मैत्री संपत गेली आणि वैयक्तिक कटुता येऊ लागली. मात्र, मध्यंतरी ‘दिलवाले’ च्या प्रमोशनसाठी शाहरूख खान ‘बिग बॉस’च्या सेटवर आला होता.